मुंबई, 23 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास (Sushant Singh Rajput Suicide Case) मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे (CBI) देण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने चक्र फिरू लागली आहेत. सीबीआयची एक टीम शनिवारी मुंबईत दाखल झाली. दुसरीकडे शनिवारी सुशांतचा 7 पानांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाच डॉक्टरांच्या टीमने हा रिपोर्ट लिहिला आहे. रिपोर्टनुसार, सुशांतच्या गळ्यावर 33 सेमी लांब एक खूण होती. त्याची जीभ बाहेर नव्हती आली. दात ठीक होते, शरीरावर कोणतीही जखम किंवा खूण नव्हती. रिपोर्टनुसार, सुशांतच्या पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडलेली नव्हती.
वाचा-सुशांतच्या घरात पाय टाकताच CBIचे अधिकारी बुचकळ्यात, जवळपास सर्व वस्तू गायब
वकिलांनी उपस्थित केले प्रश्न
रिपोर्टनुसार, तोंडातून किंवा कानातून फेस अथवा रक्त बाहेर आले नव्हते. मात्र मानेच्या खाली 33 सेंटीमीटर लांब एक खूण होती. दोरीची खूण हनुवटीच्या खाली 8 सेंमी होती. या रिपोर्टनंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी पुन्हा या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाचा-हत्या की आत्महत्या? CBI पोहोचली सुशांतच्या घरी, क्राईम सीन करणार रिक्रिएट
एम्स डॉक्टरांची मदत घेत आहे CBI
सीबीआयने दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांची मदत घेऊन पास्टमार्टम अहवालाची तपासणी केली. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, याआधी केलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये याचा उल्लेख नव्हता. विकास सिंह म्हणाले की, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सुशांतचा पास्टरमॉर्टम योग्य नव्हता की रिपोर्ट योग्यरित्या लिहिला गेला नाही. सीबीआयच्या तपासणीत सर्व काही स्पष्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वाचा-ट्रोलिंगनंतर महेश भट्ट यांच्याबरोबरच्या नात्याचा रियाने केला होता खुलासा
घरातील वस्तू गायब
सीबीआय टीमने सुशांतच्या घरात पाऊल टाकल्यानंतर त्यातील अधिकारी काही काळासाठी बुचकळ्यात पडले. कारण सुशांतच्या घरातील जवळपास सर्व वस्तू गायब आहेत. मुंबई पोलिसांच्या परवानगीने घर मालकाने सुशांतचे सर्व सामान काढण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता सर्व घर जवळपास रिकामं झालं आहे. दरम्यान, सीबीआय तपासात सुशांतचा पलंग आणि पंख्या दरम्यानची उंची मुंबई पोलिसांनी केलेल्या पंचनाम्या नुसारच आढळून आली आहे. सुशांतने फास घेतलेली हिरव्या रंगाचे कापड नाट्य रुपांतराकरता सीबीआयने आणलं होतं, तर सुशांतच्या उंचीचा वजनाचा पुतळा घेवून नाट्य रुपांतर केलं गेलं.