Home /News /entertainment /

सुशांतच्या घरात पाय टाकताच CBIचे अधिकारी बुचकळ्यात, जवळपास सर्व वस्तू गायब

सुशांतच्या घरात पाय टाकताच CBIचे अधिकारी बुचकळ्यात, जवळपास सर्व वस्तू गायब

सीबीआय टीमने सुशांतच्या घरात पाऊल टाकल्यानंतर त्यातील अधिकारी काही काळासाठी बुचकळ्यात पडले.

मुंबई, 22 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास (Sushant Singh Rajput Suicide Case) मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे (CBI) देण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने चक्र फिरू लागली आहेत. सीबीआयची एक टीम आज सुशांतच्या मुंबईतील घरी दाखल झाली होती. या टीमसोबत मुंबई पोलीस दलाचे अधिकारीही उपस्थित होते. सुशांतच्या इमारतीच्या गेटपासून ते इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेले सीसीटीव्ही आणि सुशांतच्या घराच्या दरवाज्यावर असलेले सीसीटीव्ही सीबीआयने तपासले. सीबीआय टीमने सुशांतच्या घरात पाऊल टाकल्यानंतर त्यातील अधिकारी काही काळासाठी बुचकळ्यात पडले. कारण सुशांतच्या घरातील जवळपास सर्व वस्तू गायब आहेत. मुंबई पोलिसांच्या परवानगीने घर मालकाने सुशांतचे सर्व सामान काढण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे आता सर्व घर जवळपास रिकामं झालं आहे. दरम्यान, सीबीआय तपासात सुशांतचा पलंग आणि पंख्या दरम्यानची उंची मुंबई पोलिसांनी केलेल्या पंचनाम्या नुसारच आढळून आली आहे. सुशांतने फास घेतलेली हिरव्या रंगाचे कापड नाट्य रुपांतराकरता सीबीआयने आणलं होतं, तर सुशांतच्या उंचीचा वजनाचा पुतळा घेवून नाट्य रुपांतर केलं गेलं. सुशांतच्या शरीरावरच्या जखमांचा अभ्यास करणार AIIMSची फॉरेन्सक टीम सुशांतच्या पोस्ट मार्टेम रिपोर्टबद्दल शंका उपस्थित झाल्याने आता AIIMSची फॉरेन्सक टीम त्याच्या शरीरावरच्या जखमांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करणार असून त्याचा अहवाल सीबीआयला देणार आहे. ही आत्महत्या होती की हत्या याबाबतही ही टीम आपलं मत व्यक्त करणार असल्याने या टीमचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे. सीबीआयने यासंदर्भात AIIMSला विनंती केली होती. त्यानुसार AIIMSच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडे असलेली कागदपत्र आणि सर्व रिपोर्ट्स यांचा अभ्यास करून ही समिती आपला रिपोर्ट देणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Bollywood, Sushant Singh Rajput

पुढील बातम्या