Home /News /entertainment /

सुशांच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन घेताना रिया का म्हणाली... 'सॉरी बाबू'

सुशांच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन घेताना रिया का म्हणाली... 'सॉरी बाबू'

सुशांच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन घेताना रियानं उद्गारले होते 2 शब्द, रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खुलासा

    मुंबई, 22 ऑगस्ट : सुशांतसिंह रजपूत प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBI तपास करत आहे. सीबीआयकडून सुशांतचा स्वयंपाकी नीरजची 10 तास चौकशी करण्यात आली असून 40 पानांचं जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. रोज नवीन खुलासे देखील समोर येत आहेत. सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हे गूढ मात्र अद्यापही उलगडलं नाही. या प्रकरणी आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यानंही एक मोठा खुलासा केला आहे. 14 जून रोजी सुशांतसिंह रजपूतनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. सुशांतला पाहण्यासाठी रियादेखील रुग्णालयात पोहोचली. सुशांतचे कुटुंबीय आणि मित्र परिवार अंत्यविधीमध्ये सहभागी होऊ देणार नाहीत म्हणून एकदा सुशांतला शेवटचं पाहू दे अशी विनंती रियानं कर्मचाऱ्याला विनंती केली. हे वाचा-हत्या की आत्महत्या? सुशांतच्या शरीरावरच्या जखमांचा अभ्यास करणार AIIMSचे तज्ज्ञ रुग्णालयातील कर्मचारी सुजीत सिंह राठोड यांनी रियाला सुशांच्या मृतदेहाजवळ शेवटचं पाहण्यासाठी 5 मिनिटं घेऊन गेल्याचं 'एबीपी न्यूज'नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सुजीत सांगता मी स्वत: रियाला सुशांतच्या मृतदेहाजवळ घेऊन गेलो होतो. रिया यावेळी अत्यंत भावुक झाली होती. तिला अश्रू अनावर झाले होते आणि तिने सुशांतचा हात धरून केवळ 'सॉरी बाबू' एवढे शब्द उच्चारले. 5 मिनिटं रिया तिथे होती. त्यानंतर मी तिला बाहेर घेऊन आल्याचं सुजीत सांगतात. रिया सुशांतला सॉरी का म्हणाली असावी? रियाने सुशांतसोबत शेवटच्या क्षणी बोलली नव्हती? सुशांतची आत्महत्या आहे की हत्या अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांचा छडा आज लागण्याची शक्यता आहे. याचं कारण आज सीबीआय आज पुन्हा संपूर्ण प्रकरणाचं नाट्यरुपांतर करून छ़डा लावण्याचा प्रयत्न करणार आहे. sushant singh death body sorry babu Rhea Chakraborty said Sorry Babu mhkk
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: CBI, Sushant sing rajput

    पुढील बातम्या