मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

डिसेंबरमध्ये होणार होतं सुशांतचं लग्न पण..., चौकशीनंतर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

डिसेंबरमध्ये होणार होतं सुशांतचं लग्न पण..., चौकशीनंतर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

शवविच्छेदन अहवालानंतर सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही सुशांतने हे टोकाचं पाऊल का उचललं, यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही सुशांतने हे टोकाचं पाऊल का उचललं, यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही सुशांतने हे टोकाचं पाऊल का उचललं, यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (14 जून) वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर अद्याप सुशांतनं हे पाऊल का उचललं, याबाबत चर्चा सुरू आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही सुशांतने हे टोकाचं पाऊल का उचललं, यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. काहीजणांनी सुशांतच्या नैराश्यामागे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत आता नवी माहिती समोर आली आहे. सुशांतवर सोमवारी (15 जून) परिवार आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी आत्महत्येप्रकरणी सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि मित्र महेश शेट्टी यांची चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांना सुशांतनं अखेरचा कॉल केला होता. डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्यासह 2 अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वाचा-'खूप त्रास होतोय'... या मुलाखतीत सुशांत सिंहने मोकळं केलं होतं आपलं मन चौकशी दरम्यान पोलिसांनी सुशांतची बहिण मीतू सिंह यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रियाला प्रश्न विचारले. मीतू सिंहनं आपल्या जबाबात असे म्हटले होते की, सुशांत आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हता. त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायचा. त्यानुसार सुशांत डिसेंबरमध्ये लग्न करणार होता. मात्र त्याच्या घरच्यांना सुशांतच्या मानसिक आजाराबाबत माहिती नव्हती. रियाबाबत आली महत्त्वाची माहिती समोर रिया आणि सुशांत एकत्र असल्याचं म्हटलं जात असलं तरी, याबाबत दोघांनी कधी माहिती दिली नाही.मात्र रिपोर्टनुसार लॉकडाऊनमध्ये दोघं एकत्र राहत होते. 6 जून रोजी सुशांत आणि रिया यांच्यात वाद झाला. यानंतर रिया आपल्या मैत्रिणीच्या घरी शिफ्ट झाली. या सगळ्या प्रकरणामुळं सुशांत चिंतेत होता. मात्र त्यानं याबाबत कोणालाही सांगितले नाही. जेव्हा सुशांतच्या बहिणीला याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिनं रियाला फोन करून वाद मिटवण्यास सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र रियानं एकही फोन उचलला नाही. बॉलिवूडमधील नेपोटिझम सुशांतच्या आत्महत्येला कारणीभूत? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अशा अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात ज्यामध्ये नोपेटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं जात आहे. सुशांतची आत्महत्या नव्हे तर मर्डर असल्याचं अभिनेत्री कंगणा रणौत (kangana ranaut) म्हणाली आणि तिच्या या प्रतिक्रियेनंतर कुस्तीपटू बबिता फोगटही (babita phogat) व्यक्त झाली आहे. बबिताने करण जोहरचं नाव घेत त्याच्यावर आरोप केले आहेत. "करण जोहर कोण आहे? फिल्म इंडस्ट्री त्याने किती गलिच्छ करून ठेवली आहे. त्याची मक्तेदारी आहे का? फिल्म इंडस्ट्री याला सडेतोड उत्तर का देत नाही? एक आमची वाघीण कंगना रणौतच आहे, जी त्याला उत्तर देते. या गँगच्या सर्व फिल्मवर बहिष्कार टाका" कंगनाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वाचा-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, बॉलिवूडवरील आरोपाचीही होणार चौकशी वाचा-सुशांतच्या आत्महत्येनंतर म्हणे अंकिताने डिलीट केली 'ती' पोस्ट; चर्चेला उधाण
First published:

Tags: Sushant Singh Rajput

पुढील बातम्या