मुंबई, 15 जून : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला 24 तास उलटून गेल्यानंतर आता एका नव्या वादालाच तोंड फुटलं आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली असल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही सुशांतने हे टोकाचं पाऊल का उचललं, यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. काहीजणांनी सुशांतच्या नैराश्यामागे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी बॉलिवूडमधील नेपोटिझमच सुशांतच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला, असाही आरोप होऊ लागला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अशा अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात ज्यामध्ये नोपेटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं जात आहे. अखेर याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ‘शव विच्छेदन अहवालानुसार सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालं आहे. मात्र प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्यांनुसार सुशांत सिंग राजपूत प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीमधील रायवलरीच्या अँगलचा देखील तपास केला जाणार आहे,’ अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे या तपासादरम्यान काही वेगळी माहिती समोर येते का, हे पाहावं लागेल.
काय आहे आरोप? सुशांतची आत्महत्या नव्हे तर मर्डर असल्याचं अभिनेत्री कंगणा रणौत (kangana ranaut) म्हणाली आणि तिच्या या प्रतिक्रियेनंतर कुस्तीपटू बबिता फोगटही (babita phogat) व्यक्त झाली आहे. बबिताने करण जोहरचं नाव घेत त्याच्यावर आरोप केले आहेत. “करण जोहर कोण आहे? फिल्म इंडस्ट्री त्याने किती गलिच्छ करून ठेवली आहे. त्याची मक्तेदारी आहे का? फिल्म इंडस्ट्री याला सडेतोड उत्तर का देत नाही? एक आमची वाघीण कंगना रणौतच आहे, जी त्याला उत्तर देते. या गँगच्या सर्व फिल्मवर बहिष्कार टाका” कंगनानाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती सांगते, सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं सांगत आहेत की, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की, माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल. छिछोरे सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमाला एकही अवार्ड मिळत नाही आणि गली बॉय सारख्या सिनेमाला अनेक अवॉर्ड मिळतात. अनेकांनी त्याच्यावर चुकीचे आर्टिकल लिहिले होते. यांना संजय दत्तची व्यसनं दिसत नाहीत पण त्यांनी सुशांतला व्यसनी म्हटलं होतं. अनेक लोक मला मेसेज करतात की, तुझा कठीण काळ आहे तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. याचा अर्थ असा की, या इंडस्ट्रीतले लोक अशाप्रकारे फिल्मी बॅकग्राउंड नसलेल्या कलाकारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात. सुशांतनं असं खचून जाऊन त्यांना बरोबर आणि स्वतःला चुकीचं सिद्ध करायला नको होतं. संपादन - अक्षय शितोळे