'खूप त्रास होतोय'... या मुलाखतीत सुशांत सिंहने मोकळं केलं होतं आपलं मन

'खूप त्रास होतोय'... या मुलाखतीत सुशांत सिंहने मोकळं केलं होतं आपलं मन

सध्या सुशांतच्या आतमहत्येच्या तपासालाही वेगळं वळणं लागलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रकारचे वादविवाद सुरू आहेत. पहिलं म्हणजे अतिशय हुशार अभिनेत्याबद्दल चित्रपटसृष्टी निर्दयी राहिली. दुसरीकडे त्याचे वैयक्तिक आयुष्यही स्थिर नव्हते. यामध्येही सुशांतला फार ओळखत नसलेले किंवा त्याच्या जवळ नसलेले अधिक चर्चा करीत आहेत.

अशा प्रसंगी सुशांत सिंह राजपूत स्वत: बद्दल बोलताना ऐकून तुम्हाला त्या व्यक्तीला अधिक जवळून जाणून घेता येईल. चित्रपट पत्रकार अनुपमा चोप्रा यांच्याशी झालेल्या मुलाखतीदरम्यान सुशांत आपल्या जीवनाविषयी उघडपणे बोलला होता.

सुशांत म्हणतो, "मी घरात सर्वात लहान आहे. जवळजवळ वयाच्या 20 वर्षांपर्यंत बाहेर लोकांशी कसे बोलायचे हे मला माहित नव्हते. माझ्या चार बहिणींपैकी मी लहान होतो आणि चुलतभावांमध्ये मी खूप लाडका होतो. अशा परिस्थितीत मी घराबाहेर पडल्यानंतर मला खूप त्रास सहन करावा लागला. महत्वाची बाब म्हणजे मी खूप अंतर्मुख होतो. मी फार कोणाशी शेअर होऊ शकत नव्हतो. "

सुशांतने आपल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, "कोणीतरी मला तू स्टार नाही असे म्हटले तर मला हरकत नाही. उलट मी त्या व्यक्तीचे समर्थन करीन. मी म्हणेन की मी तुझ्याबरोबर आहे, हो मी स्टार नाही.

परंतु आपली मनस्थिती आणि त्याच्या वागणुकीबद्दल सुशांत सिंह राजपूत म्हणतो,  की ती परिस्थिती अत्यंत कठीण असते जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्ही तुमचं म्हणणं शेअर करू शकत नाही. सुशांतने आपल्या बर्‍याच मुलाखतींमध्ये म्हणाला आहे की, आपली बँक बॅलेंस किती आहे याचा मला फरक पडत नाही? लोक त्याला ओळखतात की नाही. त्याऐवजी त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे तो आपलं म्हणणं मांडू इच्छितो मात्र ते सांगू शकत नाही.

हे वाचा -सुशांतच्या आत्महत्येनंतर म्हणे अंकिताने डिलीट केली 'ती' पोस्ट; चर्चेला उधाण

First published: June 15, 2020, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading