मुंबई, 07 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. दरम्यान या प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज, त्याचे सहकलाकार, मित्र, कुटुंबीय यांची मुंबई पोलिसांडून चौकशी केली जात आहे. सोमवारी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी सुशांत सिंग सोबत 4 चित्रपट करण्याचा विचार करत होते. तारखांच्या गडबडींमुळे आणि इतर काही कारणांमुळे सुशांत हे चित्रपट करू शकला नाही. यासंदर्भात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा जबाब या प्रकरणी नोंदवण्यात आला आहे. (हे वाचा- सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती उघड, घरामध्ये कुठेही नव्हता CCTV ) संजय लीला भन्साळी यांनी सोमवारी पोलिसांना अशी माहिती दिली की, सुशांतने त्यांना चित्रपट करण्यास मनाई केली होती कारण तो YRF बरोबरच्या काँट्रॅक्टमध्ये बांधिल होता. संजय लीला भन्साळी यांची वांद्रे पोलिसांकडून जवळपास 3 तास चौकशी झाल्यानंतर जोन 9 डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये त्यांची आणखी एक तास चौकशी केली. मात्र अद्याप पोलीस कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचले नाही आहेत. संजय लीला भन्साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 नंतर त्यांचे सुशांत बरोबर कोणतेही बोलणे झाले नाही आहे. (हे वाचा- ‘तेरी मासूम हँसी पे, मैं जी लेता हू’ सुशांतच्या स्माईलमागे होतं इतकं दु:ख की…) संजय लीला भन्साळी यांनी असे सांगितले की, सुशांतशी तसे जवळचे संबंध नसल्यामुळे त्याच्या नैराश्याबाबत त्यांना माहित नव्हते. जेव्हा पोलिसांनी त्यांच्या चौकशीत सुशांतला चित्रपटातून काढून टाकण्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, सुशांतचे पूर्ण लक्ष यशराज फिल्सच्या येणाऱ्या चित्रपटाकडे होते. सुशांतने दोन मोठ्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. संजय लीला भन्साळी यांच्या मते त्यांनी कधीही सुशांतला त्यांच्या चित्रपटातून ‘ड्रॉप’ केले नव्हते. ‘पानी’ या चित्रपटात सुशांत YRF बरोबर काम करणार होता, परिणामी त्याला भन्साळींची ऑफर स्विकारता आली नाही आणि त्यानंतर भन्साळींनी त्याला चित्रपटाबाबत विचारले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. संजय लीला भन्साळींना या चौकशीत जवळपास 30 ते 35 प्रश्न विचापण्यात आले. संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.