मुंबई, 25 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput) आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपास आतापर्यंत सीबीआय (cbi) करत होतं. त्या मार्गाने तपास सुरू असताना आता सीबीआयने सुशांतच्या मृत्यूमागे काही आर्थिक कारणं तर नाहीत ना, या बाजूनेही तपास सुरू केला आहे. सीबीआयने नोंदवलेल्या जबाबांमधून सुशांतच्या मृत्यूमागे आर्थिक कारण असू शकतं, असा संशय आहे.
सुशांत मृत्यू प्रकरणात ईडीपाठोपाठ आता सीबीआयदेखील आर्थिक आरोपांबाबत तपास सुरू केला आहे. त्यासाठी सुशांतचा पर्सनल अकाऊंटंट रजत मेवानी, कंपनीचा सीए संदीप श्रीधर, कुक नीरज आणि केशव, सुशांतसह त्याच्या फ्लॅटमध्ये राहणारा सिद्धार्थ पिठानी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. दोन्ही यंत्रणा सारख्याच व्यक्तींची चौकशी करत आहे, मात्र चौकशीतील मुद्दे वेगवेगळे आहे. .
ईडी काय तपास करत आहे.
कंपन्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आल्या आहेत का?
कंपन्यांवर नेमण्यात आलेले संचालक कायदेशीर नेमले आलेत का?
सुशांतच्या कंपन्यांमध्ये संशयास्पद गैरव्यवहार झाले आहेत का?
सुशांतच्या कंपन्यांमधून अवैध पद्धतीने पैशांची देवाण घेवाण झाली आहे का?
सीबीआय काय तपास करत आहे.
सुशांतचं कुणाशी भांडण व्हायचं का?
सुशांतची भांडणं आर्थिक कारणांवरून होत होती का?
सुशांत आणि रियामध्ये किती वेळा आर्थिक कारणांवरून भांडणं झाली होती?
सुशांतच्या कंपनीवर ॲाडिटर म्हणून नेमणूक सुशांतच्या सहमती होती का? आणि सुशांत, रिया किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळे संपर्क करायचे का?, असा प्रश्न संदीप श्रीधर यांनी विचारण्यात आला आहे.
याच आर्थिक कारणांमुळे सुशांत नैराश्यात गेला होता का?
हे वाचा - रिया होती सुशांतच्या मॅनेजरच्या कायम संपर्कात, CBI उलगडणार गुपीत
दरम्यान या प्रकरणात संशयाची सगळी सुई ही सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती भोवती फिरत आहे. रिया ही सुशांतचा मॅनेजर सॅम्युलच्या सतत संपर्कात होती असं आता स्पष्ट होत आहे. सीबीआयने रिया आणि सॅम्युलच्या फोन्सचे डिटेल्स CDR मिळवला असून त्यातून ही गोष्ट पुढे आली आहे. सॅम्युल हा घरातील व्यवहार आणि खर्चाची, बँकांची कामं पहायचा त्यामुळे सीबीआय आता सॅम्युल आणि रियाच्या CDRचा अभ्यास करत आहे. आता त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याचं गुपीत उलगडण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.
हे वाचा - 'सुशांतच्या खोलीत कुणी येऊ शकत नव्हतं', CBI रिक्रिएशनमध्ये गोष्टींचा उलगडा
सीबीआयने चौकशीचा फास आवळला असून लवकर यातून सत्य समोर येईल. असा दावा सीबीआय करत आहे.