'13 जूनच्या रात्री 5 ते 6 जण आले होते सुशांतच्या घरी'; मित्राच्या दाव्याने बॉलिवूडमध्ये खळबळ

'13 जूनच्या रात्री 5 ते 6 जण आले होते सुशांतच्या घरी'; मित्राच्या दाव्याने बॉलिवूडमध्ये खळबळ

सुशांतच्या मित्राने केलेल्या या दाव्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर आता त्याचा मित्र गणेश हिवारकर (Ganesh Hiwarkar) याने मोठा खुलासा केला आहे आणि तो अत्यंत धक्कादायक आहे.

गणेश हिवारकर याने दावा केला आहे की अभिनेता सुशांतच्या कथित आत्महत्येच्या एक रात्री आधी म्हणजेच 13 जूनच्या रात्री काही 5 ते 6 जण त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये पोहोचले होते. सुशांत (Sushant Singh Rajput) ला दिशा सालियन (Disha Salian) हिच्या मृत्यूच्या सत्यतेबाबत माहिती होती. इतकचं नाही तर तो यावर एक पत्रकार परिषदही घेणार होता.

रिपब्लिक टीव्हीसोबत बातचीत करताना गणेश हिवारकर (Ganesh Hiwarkar) याने सांगितले की  'मी सप्टेंबर 2019 मध्ये सुशांतशी बातचीत केली होती, तेव्हा तो खूप पॉजिटिव्ह होता आणि भविष्याचं प्लानिंग करीत होता'. यानंतर कथित आत्महत्येच्या आदल्या दिवशी 13 जूनच्या रात्रीबाबत सांगताना अभिनेत्याच्या मित्राने सांगितले की 13 जूनच्या रात्री 5 ते 6 जण सुशांतच्या घरी पोहोचले होते. ही गोष्ट मला सुशांतचा मित्र संदीप सिंह याच्यासह काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितली. गणेशने दावा केला आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा संबंध दिशा सालियानच्या मृत्यूशी आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात वकील विकास सिंह (Lawyer Vikas Singh) यांनी सुशांतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टवर (Post mortem Report) सवाल उपस्थित केला होता. सुशांतच्या वडिलांना विकासला सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याला मारल्यानंतर फाशी देण्यात आली होती की त्याचा मृत्यू फाशीमुळे झाला होता? त्यांनी सांगितले की या सर्व गोष्टी मृत्यूची वेळ माहिती असल्यावरचं स्पष्ट होऊ शकतील.

Published by: Meenal Gangurde
First published: August 16, 2020, 10:03 PM IST

ताज्या बातम्या