नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सध्या ट्विटरवर आमिर खानविरोधात नेटकऱ्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आमिरनं आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तुर्कीमधील फर्स्ट लेडी अर्थात राष्ट्रपतींच्या पत्नीची रविवारी भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो एमीन एर्दोगान यांनी ट्वीट केल्यानंतर भारतात या फोटोवर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या आमिर त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘लाल सिंह चड्डा’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचं शूटिंग तुर्कस्थानमधील वेगवेगळ्या भागांध्ये केलं जात आहे. या शूटिंगनिमित्तानं आमिर सध्या तुर्कीत आहे. तिथे रविवारी त्यानं राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगान यांची भेट घेतली.
I had the great pleasure of meeting @aamir_khan, the world-renowned Indian actor, filmmaker, and director, in Istanbul. I was happy to learn that Aamir decided to wrap up the shooting of his latest movie ‘Laal Singh Chaddha’ in different parts of Turkey. I look forward to it! pic.twitter.com/3rSCMmAOMW
— Emine Erdoğan (@EmineErdogan) August 15, 2020
याच कारणही तेवढंच खास आहे. तुर्कीचे राष्ट्रपती पाकिस्तानला सपोर्ट करतात. देशात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवताना त्याचा विरोध करणारे ही तुर्कीचे राष्ट्रपतीचे होते. त्यामुळे आमिर खाननं ही भेट घेणं अपेक्षित नसल्यानं सोशल मीडियावर नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
हे वाचा- सिनेसृष्टीला आणखी एक धक्का, ‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन 2018 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट आमिर खान यांनी नाकारली होती. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना भेटले होते. तेव्हा शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांनी ही भेट नाकारली. इस्रायलने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा दिला आहे असं असतानाही इम्रान खान यांनी त्यांची भेट नाकारली. तर तुर्कस्थानचे राष्ट्रपती खुलेआम पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरवरून होत असणाऱ्या वादात पाकिस्तानची बाजू घेत असतना आमिरनं त्यांना भेटणं अपेक्षित नव्हतं. आमिर खानच्या भेटीनं तुर्कीची पहिला महिला खूप खूश आहे तर अशावेळा एकीकडे भारतात मात्र नेटकऱ्यांनी आमिरला तुफान ट्रोल केलं आहे. त्याच्या आगामी सिनेमावर बंदी घालण्याबाबतही अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे.