Home /News /entertainment /

"मामा तू म्हणाला होतास आपण कधी मरत नाही पण...", सुशांतच्या भाचीची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

"मामा तू म्हणाला होतास आपण कधी मरत नाही पण...", सुशांतच्या भाचीची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) बहिणींनंतर त्याच्या भाचीनेही आता अशी भावुक पोस्ट केली आहे.

  मुंबई, 21 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. कुणीच त्याला विसरू शकलेलं नाही. सुशांतच्या बहिणी सोशल मीडियावर सातत्याने इमोशनल पोस्ट शेअर करत असतात. मात्र आता पहिल्यांदाच त्याची भाची कात्यायनी आर्या राजपूतने (Katyayni Aarya Rajput) भावुक अशी पोस्ट केली आहे. कात्यायनीला आपल्या गुलशन मामाची आठवण येत आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर त्याच्यासह एक फोटो शेअर करत,  इमोशनल पोस्ट लिहिली आहे. जी वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यातही अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कात्यायनी म्हणाली, "गुलशन मामा, मी तुझ्यावर ब्रह्मांडापेक्षाही भरपूर प्रेम करते. तू माझ्यासाठी आधीपासून अनमोल होत आणि आजही आहे. भविष्यात आपण कधी आकाशात पाहू आणि प्रत्यक्षात रहस्यवादावर चर्चा करू असा विचार मी करायचे. तुझ्या प्रत्येक बोलण्याने मला मंत्रमुग्ध केलं आणि मला नेहमी तू प्रेरित केलं. तुझा आवाज कधीच ऐकू शकणार नाही, असा दिवस येईल असं कधी कल्पनेतही वाटलं नव्हतं. तू एकदा म्हणाला होतास प्रत्यक्षात आपण कधीच मरत नाहीत. यावर मला खरंच विश्वास ठेवायचा आहे मात्र प्रत्येक दिवसाला हे खूप कठीण होतं आहे"
  View this post on Instagram

  Gulshan mama, I love you more than the universe. You were and still are the most precious person to me. I always thought that sometime in the future we would look up at the sky and discuss the mysticism in reality. Your talks about life always mesmerised me and always pushed me to do better, I never thought that I would have to see such a day when I would never be able to hear your voice again. You were more than what others thought of you, you were more than what I thought of you. You were more than what you thought of yourself. You were and still are an unstoppable force of energy that was too much for this world to contain. You once told me that we in reality never really die and I really want to believe you but it gets harder by each and everyday. I just wish I could travel into a parallel universe where the world is a better place and we are together smiling, star-gazing and laughing at the “intellectual” jokes you make. I always imagined that when I would grow up I would take you to my house, in the hills and see the pride in your eyes as you looked at me with a satisfied smile. I know in some parallel universe I would be fortunate enough to see that, but it pains me when I realise that it would not be this universe. But I must not let my grieve drag me down and hamper my evolution because it would be a shame if I allowed it to happen. Your blood flows through my veins and I intend on making full use out of it. Gulshan mama, I am going to make you proud. I will always love you Gulshan Mama ❤️.

  A post shared by Katyayni Aarya Rajput (@katyayni.aarya.rajput) on

  "कदाचित मी पॅरलल युनिव्हर्समध्ये जाऊ शकले असते, जिथं जग थोडं अधिक चांगलं असेल आणि आपण एकत्र हसू, तारे पाहू आणि तुझ्या इंटलॅक्युअल जोक्सवर एकत्र हसू. जेव्हा मी मोठी होईन तेव्हा तुला माझ्या घरी घेऊन जाणार, डोंगरावर आणि तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल अभिमान पाहेन असा विचार मी नेहमी करायचे. दुसऱ्या जगात मी असं पाहिने हे मला माहिती आहे, मात्र ती दुनिया ही नाही याची खंत वाटते" असं कात्यायनी म्हणाली. हे वाचा - "प्रेमात एक वर्षानंतर एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो", रियाचा VIDEO VIRAL "मी आणि जगानं तुला जितकं ओळखलं त्यापेक्षा तू वेगळा होतास. तू एका ऊर्जेने भरलेला अशी व्यक्ती होता, जिला जग थांबवू शकत नव्हती. स्वत:च्या दुःखाने मी प्रभावित होणार नाही, स्वतःचा विकास रोखू देणार नाही कारण असं झालं तर माझ्यासाठी ही शरमेची बाब असेल. तुझंच रक्त माझ्या नसानसात वाहत आहे आणि त्याचा पुरेपूर वापर मला करायचा आहे. गुलशन माम तुला माझा अभिमान वाटेल. मी तुझ्यावर नेहमी असंच प्रेम करत राहिने गुलशन मामा" कात्यायनीचीही ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतचे चाहते यावर प्रतिक्रियाही देत आहेत. हे वाचा - सोनाक्षीचा ऑनलाइन छळ करणारा अटकेत; अभिनेत्री म्हणाली, "सावध राहा आता तुमचा नंबर" सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला मुंबईतील वांद्र्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबाने सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या