• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रिया म्हणजे विषकन्या, सुशांतच्या मृत्यूला ‘गँग’ जबाबदार; बिहारच्या मंत्र्यांचा खळबळजनक आरोप

रिया म्हणजे विषकन्या, सुशांतच्या मृत्यूला ‘गँग’ जबाबदार; बिहारच्या मंत्र्यांचा खळबळजनक आरोप

'या गँगने रियाला हाताशी धरून सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याचे पैसे लंपास केले. नंतर भूत-प्रेत, काळी जादू असं नाटक केलं'

 • Share this:
  पाटना 31 जुलै: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सुशांतची मित्र रिया चक्रवर्ती ( Rhea Chakraborty)  ही आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून सुशांतच्या कुटुंबीयांसह अनेकांनी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यात आता भर पडली ती बिहारचे मंत्री आणि जेडीयुचे नेते महेश्वर हजारी यांची. त्यांनी रियावर गंभीर आरोप करत मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. हजारी म्हणाले, सुशांतसाठी रिया चक्रवर्तीही विषकन्या ठरली आहे. सुशांच्या मृत्यूला एक मोठी गँग कारणीभूत आहे. त्यांची नावं समोर आली पाहिजेत. या गँगने रियाला हाताशी धरून सुशांतला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याचे पैसे लंपास केले. नंतर भूत-प्रेत, काळी जादू असं नाटक केलं आणि सुशांतला अभिनयापासून दूर केलं असे आरोपही त्यांनी केलेत. सुशांतच्या कुटुबीयांना आणि चाहत्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या लोकांची नावं समोर आली पहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई पोलीस हे बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रिया चक्रवर्ती हिने पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे. 'माझा देवावर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. माझ्याबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल,' असं म्हणत अभिनेता सुशांतसिंह राजूपत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'सुशांत आत्महत्या करण्या इतका कमजोर नव्हता...', EX-गर्लफ्रेंड अंकिताचा खुलासा दरम्यान, ईडीने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले, त्यांची चौकशी ई़डीकडून केली जाणार आहे. बिहार पोलिसांच्या सुशांत मृत्यूप्रकरणातील एफआयआरच्या आधारावर मनी लाँड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्र बिहार पोलिसांकडे मागितले होते. त्याचप्रमाणे ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक खात्यांची माहिती, तसंच सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली होती.
  Published by:Ajay Kautikwar
  First published: