

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी दिवसेंदिवस गूढ वाढतच चाललं आहे. कारण बॉलिवूडमधील एका गटामुळे सुशांतने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप होत असतानाच आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधातही आरोपांची राळ उठली आहे.


मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच या प्रकरणात आता बिहार पोलिसांचीही एण्ट्री झाली आहे. तसंच अनेकांकडून आता याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे.


राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांची भेट घेत सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर आता अभिनेते शेखर सुमन यांनी याच मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली आहे.


अभिनेते शेखर सुमन यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन सुशांत सिंह राजपुत प्रकरणाची सी. बी. आय. मार्फत चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले.