'अंकिता लोखंडेला तो नेहमी...' सुशांतबाबत डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

'अंकिता लोखंडेला तो नेहमी...' सुशांतबाबत डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतच्या लव्ह लाइफबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 20 जून : सुशांत सिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) आत्महत्या का केला हा प्रश्न आज अनेकांच्या मनात कायम आहे. काम मिळत नव्हतं, अंकिता लोखंडेसोबतचं (Ankita Lokhande) ब्रेकअप, फिल्म इंडस्ट्रीतले टेन्शन, प्रोड्युसर्ससोबत मतभेद, गर्लफ्रेंड रियासोबतचं भांडण, प्रॉडक्शन हाऊसचं बॉयकॉट करणं अशी अनेक कारणं दिली जात आहेत. मागच्या बऱ्याच काळापासून सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचं बोललं जात आहे. ज्यावर तो उपचार सुद्धा घेत होता. नुकतीच पोलिसांनी त्याच्या मानसोपचार तज्ज्ञांची (Sushant Singh Rajput Psychiatrist)चौकशी केली. ज्यात अनेक नवे खुलासे झाले आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ही गोष्ट समोर आली की सुशांत मागच्या 6 महिन्यांपासून डप्रेशनची ट्रीटमेंट घेत होता. पोलिसांना त्याच्या घरात त्याची फाइल सुद्धा मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात त्याच्या डॉक्टरांची सुद्धा चौकशी केली. ज्यात त्यांनी अनेक नवीन खुलासे केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार डॉक्टरांनी सांगितलं की, सुशांत मागच्या वर्षभरापासून नैराश्यग्रस्त होता आणि मागच्या 6 महिन्यांपासून त्यांच्याकडे उपचार घेत होता.

डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतच्या लव्ह लाइफबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितलं, एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत त्याच्या लाइफमध्ये सर्व ठिक होतं. अंकितानंतर कृती त्यांच्या आयुष्यात आली. पण ते नातं फार काळ टिकलं नाही.

6 जूनला नेमकं काय झालं की रिया चक्रवर्तीने सुशांतचं घर सोडायचं ठरवलं?

सुशांतनं डॉक्टरांना सांगितलं होतं की, त्याला गाढ झोप लागत नाही. त्याच्या मनात वेगवेगळे आणि विचित्र विचार येतात. काही अयशस्वी रिलेशनशिपनंतर त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती की, अंकिता एवढं त्याला कोणीच समजून घेतलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, सुशांत बायपोलर होता. म्हणजे तो एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करत असे.

डॉक्टरांनी यावेळी त्याची सध्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा सुद्धा उल्लेख केला. ते म्हणाले, रिया आणि तो एका कॉमन फ्रेंडमुळे भेटले होते. त्यावेळी रिया तिच्या एका मैत्रिणीसोबत वर्सोव्यात राहत होती. काही दिवसांनी सुशांत रियाला आपल्या घरी घेऊन आला. रिपोर्टनुसार डॉक्टरांनी पुढे सांगितलं की, जेव्हा सुशांतनं रिया सोबतच्या नात्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती त्यावेळी तिनं सुशांतशी भांडण केलं आणि त्याला ती पोस्ट डिलिट करायला लावली होती.

'सुशांतची हत्या केली त्यांनी माझंही इमोशनल लिचिंग केलं'; कंगनाने जारी केला VIDEO

डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं की, सुशांतला नेहमीच त्याच्या आयुष्यात अंकिताची उणीव भासत राहिली. तो नेहमीच तिची आठवण काढ असे. तो तिच्याशी खूपच अटॅच्ड होता. त्याला या गोष्टीचीही जाणीव झाली होती की, अंकिताशी ब्रेकअप करणं ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. मागच्या 6 महिन्यात सुशांत 3 वेळा डॉक्टरांना भेटला होता. त्यानंतर त्यानं डॉक्टरांना भेटण्यासाठी वेळ मागून घेतली होती मात्र लॉकडाऊनमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

Suicide or Murder: सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर लवकरच मुव्ही, पोस्टर झळकलं

First published: June 20, 2020, 9:53 AM IST

ताज्या बातम्या