मुंबई, 02 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. त्याच्या आत्महत्येनंतर तब्बल 30 जणांची चौकशी करण्यात आली. मात्र अद्यापही सुशांतनं आत्महत्या का केली, याचा सुगाव पोलिसांना लागला नाही आहे. दरम्यान, आता बॉलिवूडमधील काही दिग्गज दिग्दर्शकांची चौकशीही केली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत भन्साळी यांची चौकशी केली जाईल, यासाठी त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. त्याचबरोबर यश राजच्या कास्टिंग डिरेक्टर शानु शर्मा यांचीही चौकशी केली जाणार आहे. शानु शर्मा गेली अनेक वर्ष यश राजमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करतात.
याचबरोबर कंगना रणौत आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी या दोघांची चौकशी नाही तर त्यांचे मत विचारले जाणार आहे. बॉलिवूड क्वीन कंगना रणौत, दिग्दर्शक शेखर कपूर, अनुभव सिन्हा, सुशांतच्या हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी याआधी सुशांत नेपोटिझमची शिकार झाल्याचे म्हटले होते.
वाचा-सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 30 जणांची चौकशी, तरी हे प्रश्न अनुत्तरितच!
'सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या'
सुशांतच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक आणि भाजप आमदार नीरज सिंह बबलू यांनी देखील सुशांतची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी देखील असा सवाल उपस्थित केला होती की, छिछोरे हिट झाल्यानंतर सुशांतने 7 मुव्ही साइन केल्या होत्या मात्र त्या त्याच्या हातातून निसटल्या. असा प्रकार का घडला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवून घेतले गेले आहेत, काहींची पुन्हा एकदा चौकशी देखील होत आहे. तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने चाहते, सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या सहकलाकारांनी निराशा व्यक्त केली आहे.
वाचा-सुशांतच्या आत्महत्येवेळी घरात होता त्याचा मित्र, पोलिसांकडून पुन्हा एकदा चौकशी
सुशांतच्या आत्महत्येवेळी घरातच उपस्थित होता मित्र
सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी याची देखील चौकशी करण्यात आली. सिद्धार्थ पिथानी सुशांतचा मित्र तर होताच पण त्याचबरोबर तो त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून देखील काम पाहायचा. सिद्धार्थ सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या घरातच उपस्थित असल्याने बुधवारी त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सुशांतने गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मात्र तो या निर्णयापर्यंत का पोहोचला आणि त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास वांद्रे पोलिसांकडून केला जात आहे.
वाचा-मोठ्या पडद्यावरील सुशांतच्या आठवणीत नेणारा VIDEO!नेहा कक्करचे म्यूझिकल ट्रिब्यूट
संपादन-प्रियांका गावडे.