मुंबई, 29 जुलै: झी मराठीवर अनेक नवीन मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजपासून म्हणजेच 29 जुलै पासून झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा नवाकोरा कार्यक्रम सुरू होतोय. एक नवी संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात अनेक महिला केंद्रस्थानी असणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. अभिनेता सुबोध भावे या कार्यक्रमात सुत्रसंचालन करणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या भागात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या खासदार सुप्रिया सुळे सहभागी होणार आहेत. बस बाई बस कार्यक्रमाच्या पहिल्या भागात सुप्रिया ताईंनी विरोधकांना आपल्या भाषेत उत्तर देत चांगलीच धम्माल उडवून दिली आहे. मालिकेचा एक प्रोमो झी मराठीनं शेअर केला आहे. ज्यात सुप्रिया ताईंनी चंद्रकांता पाटलांच्या त्या सल्ल्यावर उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे या सोशल मीडियावर चांगल्या सक्रीय असतात. अनेक ठिकाणी भेटी देऊन त्या त्यांचं मत सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. असाच त्यांच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात त्या भाकऱ्या थापताना दिसत होत्या. ताईंचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला मात्र या व्हिडीओवर चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया ताईंनी आता ‘घरी बसून भाकऱ्याच थापा’ असा सल्ला देत खोचक टीका केली होती.
यासंदर्भात बस बाई बस या कार्यक्रमात सुत्रसंचालक सुबोध भावेनं सुप्रिया ताईंना प्रश्न केला. या प्रकरणावर त्यांचं काय मत आहे असं त्यांना विचारल्यानंतर त्यांनी ‘मला होममेकर असल्याचा सार्थ अभिमान आहे’, अशा शब्दांत उत्तर दिलं. हेही वाचा - Bas Bai Bas: शरद पवारांच्या घरात शिंदेंचं राज्य; ‘बस बाई बस’मध्ये सुप्रिया सुळेंनी केली पोलखोल त्या म्हणाल्या, ‘मला त्याचं काही फार वाईट वाटलं नाही. कारण मी एक महिला आहे. मी एक होममेकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. घरात स्वयंपाक करण्याला मी कमीपणा समजतच नाही. शेवटी दिवसभर कितीही काम केलं तरी घरी गेल्यावर तुम्हाला घरचंच जेवण लागतं. इथे सेटवरही तुम्ही जेवाल तेव्हा पहिला घास घेतल्यावर तुम्हाला घरच्याच जेवणाची आठवण येईल. विरोधक काय बोलतात हे मी फारसं मनाला लावून घेत नाही. इतकं चालतं. त्याशिवाय मज्जा कशी येणार. थोडी तुम्ही टीका करायची थोडी आम्ही करायची’, असं हसत हसत सुप्रिया ताई म्हणाल्या.
पुढे सुप्रिया ताईंना चंद्रकांत दादा काय सांगात ते हा कार्यक्रम पाहत असतील त्यांन काय सांगात असा प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘चंद्रकांत दादांना प्रेमानं नमस्कार’, असं उत्तर दिलं. दरम्यान सुप्रिया ताईंनी कार्यक्रमात चंद्रकांत दादांना पुढे म्हणाल्या, ‘केंद्राचा फंड आजकाल मिळत नाही. मोदी साहेबांनी कट लावला आहे. तुम्ही सांगा मोदी साहेबांना एनपी फंड लवकर द्यायला. लोकं म्हणतात तुमचे आणि अमित शाह यांचे चांगले संबंध आहेत. माझेही बरे आहेत. आधी मला त्यांना पार्लमेंट पाहून दडपण वाटायचं पण आता रोज रोज पाहून सवय झाली आहे. माझ्या डिबेटला ते उपस्थित असतात. बाकी वहिनींना विचारलं सांगा आणि लवकर घरी जेवायला या असं म्हणत सुप्रिया ताईंना चंद्रकांत पाटलांना आमंत्रण देखील दिलं.