मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rajinikanth B'day Spl: कधी कुली तर कधी कंडक्टरचं केलं काम, 'थलायवा' पर्यंतचा रजनीकांत यांचा कठीण प्रवास

Rajinikanth B'day Spl: कधी कुली तर कधी कंडक्टरचं केलं काम, 'थलायवा' पर्यंतचा रजनीकांत यांचा कठीण प्रवास

सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाभरात प्रसिद्ध आहे. आज रजनीकांत यांचा वाढदिवस आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाभरात प्रसिद्ध आहे. आज रजनीकांत यांचा वाढदिवस आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाभरात प्रसिद्ध आहे. आज रजनीकांत यांचा वाढदिवस आहे.

मुंबई, 12 डिसेंबर - Happy Birthday Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाभरात प्रसिद्ध आहे. केवळ अभिनयाच्या चमकदार कामगिरीनेच नाही तर राजकारणी म्हणूनही रजनीकांत यांची खास ओळख आहे. रजनीकांत  दक्षिण भारतीय लोकांच्या हृदयावर राज्य करतात. आज रजनीकांत यांचा वाढदिवस (Rajinikanth Birthday Special) त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. रजनीकांत यांचा वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी एक मोठा उत्सवच असतो.रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी झाला. आज जरी रजनीकांत जनतेच्या हृदयावर राज्य करत असले तरी इथपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. थलायवा म्हणजेच रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त आज अशाच काही त्यांच्या आय़ुष्याशी संबंधीत रंजक गोष्टींचा उलगडा करणार आहे.

खरं नाव शिवाजीराव गायकवाड

आज थलायवा या नावाने प्रसिद्ध झालेल्या रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांचे बालपण अडचणी आणि कष्टाने भरलेले होते. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा अडचणी आणखी वाढल्या.

वाचा : कतरिना-विकीने मेंदी सोहळ्यात केली फुलटू धमाल, फोटोत दिसलं फक्त प्रेम..

कुलीपासून कंडक्टरपर्यंत काम करून चालवलं घर

एक वेळ अशी आली की घर चालवण्याची जबाबदारी रजनीकांत यांच्या खांद्यावर आली. घराची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी सर्व कामे केली. रजनीकांत यांनी घर चालवण्यासाठी कुलीपासून कंडक्टरपर्यंत काम केले. घर सांभाळण्यासाठी कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या रजनीकांतचे नेहमीच अभिनेता होण्याचे स्वप्न होते.

rajinikanth, happy birthday rajinikanth

अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली कन्नड नाटकांमधून

रजनीकांत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कन्नड नाटकांमधून केली. तिथे त्यांनी महाभारतातील दुर्योधनाची भूमिका साकारली आणि त्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. रजनीकांत यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी तमिळ भाषेचे शिक्षण घेतले. त्यांचा पहिला चित्रपट 'अपूर्व रागांगल' होता. या चित्रपटात कमल हसन यांनी देखील काम केले आहे.

वाचा : Ankita Lokhande च्या हातावर सजली विकीच्या नावाची मेहंदी; VIDEO व्हायरल

रजनीकांत यांना 'बिल्ला' या चित्रपटाने मिळवून दिली खरी ओळख

रजनीकांत यांना 'बिल्ला' या चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली. 1978 मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' चित्रपट 'बिल्ला'चा रिमेक होता. रजनीकांत यांनी ‘मुंदरू मूगम’ या चित्रपटात पहिल्यांदा ट्रिपल रोल केला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना तामिळनाडू सरकारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही दिला होता. याशिवाय ते अनेकदा वादातही सापडले आहेत.

First published:
top videos