जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sunny movie song: घरापासून दूर असलो तरी 'मी नाचणार भाई'; ललित प्रभाकरचं भन्नाट गाणं पाहिलं का?

Sunny movie song: घरापासून दूर असलो तरी 'मी नाचणार भाई'; ललित प्रभाकरचं भन्नाट गाणं पाहिलं का?

लतित प्रभाकर

लतित प्रभाकर

‘सनी’ या चित्रपटातील धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अभिनेता लतित प्रभाकर बिनधास्त अंदाजात पाहायला मिळत आहे. काय आहे या गाण्याची खासियत बघा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 ऑक्टोबर : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग होतायत. विविध विषय आणि धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. प्रेक्षकांना सुद्धा हे चित्रपट पसंत पडत आहेत. असाच एक नवीन चित्रपट येणाऱ्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘सनी’. घरापासून दूर राहत असलेल्या प्रत्येकाची ही  गोष्ट असणार आहे. आता या चित्रपटातील धमाल गाणं  प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अभिनेता लतित प्रभाकरचा बिनधास्त अंदाजात पाहायला मिळत आहे. काय आहे या गाण्याची खासियत बघा. ‘सनी’ मधील ‘नाचणार भाई’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून युट्यूबवर सध्या फक्त याचेच किस्से आणि गावांची धमाल नावं पाहायला मिळत आहेत. घरापासून दूर असल्यावर क्षणोक्षणी घरच्यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. अशात जर जिवाभावाचे काही मित्र सापडले तर मनावरच ओझं थोडं हलकं होतं. वेगवेगळ्या गावातून एकत्र आलेल्या काही मित्रांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. हेही वाचा - सारा-शुभमनचं नक्की काय चाललंय?; डेटिंगच्या बातम्यांदरम्यान पुन्हा नवा VIDEO व्हायरल वेगवेगळ्या गावातून एकत्र जमलेल्या मित्रांची धम्माल, मस्ती या गाण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. या गाण्यात आपल्याला ललित प्रभाकर सोबत क्षिती जोग, अभिषेक देशमुख हे कलाकार थिरकताना दिसत आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यास प्रोत्साहित करणारं, ताजतवानं करणारं हे गाणं प्रत्येक बर्थडे पार्टीमध्ये, आनंद सोहळ्यात हे गाणं वाजणार हे नक्की. ललित प्रभाकरचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.

जाहिरात

या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ’’ जेव्हा वेगवेगळ्या देशातील, भागातील मित्र शिक्षणानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येतात तेव्हा हे मित्रच त्यांचा परिवार बनतात आणि मग आनंदाचा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासोबतच साजरे करतात. हे गाणंही असाच अनुभव देणारं आहे. असा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकालाच हे गाणं आपल्या ‘त्या’ दिवसांची आठवण करून देणारं आहे.’’

News18लोकमत
News18लोकमत

प्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. या गाण्याला सिद्धार्थ आणि सौमील यांनी संगीत दिले असून नृत्यदिग्दर्शनाची धुरा सुजीत कुमार यांनी सांभाळली आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन  प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे तर ‘सनी’चे लेखन इरावती कर्णिक यांचे आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात