मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sunny Leone ला नाकारली बांगलादेशात शूटिंगची परवानगी, याआधीही घडला आहे असा प्रकार; काय आहे प्रकरण?

Sunny Leone ला नाकारली बांगलादेशात शूटिंगची परवानगी, याआधीही घडला आहे असा प्रकार; काय आहे प्रकरण?

सनी लिओनीला बांग्लादेशमध्ये काम करण्याची परवानगी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे. बांग्लादेशकडून तिचं वर्क परमिट नाकारण्यात आलं आहे, अशी घटना तिच्यासह 2015 मध्ये देखील घडली होती.

सनी लिओनीला बांग्लादेशमध्ये काम करण्याची परवानगी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे. बांग्लादेशकडून तिचं वर्क परमिट नाकारण्यात आलं आहे, अशी घटना तिच्यासह 2015 मध्ये देखील घडली होती.

सनी लिओनीला बांग्लादेशमध्ये काम करण्याची परवानगी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे. बांग्लादेशकडून तिचं वर्क परमिट नाकारण्यात आलं आहे, अशी घटना तिच्यासह 2015 मध्ये देखील घडली होती.

मुंबई, 11 मार्च: सनी लिओनीला बांगलादेशमध्ये काम (Sunny Leone Work Permit Cancelled in Bangladesh) करण्याची परवानगी पुन्हा एकदा नाकारण्यात आली आहे. बांगलादेशकडून तिचं वर्क परमिट नाकारण्यात आलं आहे, अशी घटना तिच्यासह 2015 मध्ये देखील घडली होती. सनीच्या पहिल्याच बंगाली भाषेतील सिनेमाबाबत हा प्रकार घडला आहे. सनीच्या 'सोल्जर' सिनेमाचं शूटिंग बांगलादेशमध्ये करण्याची योजना होती, पण आता वर्क परमिट नाकारल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांना शूटिंग रद्द करावे लागत आहे. सनीचा हा पहिलाच इंडो-बांगलादेशी सिनेमा आहे.

आगामी सिनेमाचं शूटिंग होणार होतं बांगलादेशात

बॉलिवूडमध्ये आपलं पक्क स्थान मिळवल्यानंतर सनी पहिल्यांदाच इंडो-बांगलादेशी सिनेमा करत आहे. मात्र वर्क परमिट रखडल्याने तिच्या या सिनेमाचं शूटिंग आणि रीलिज दोन्ही लांबणीवर पडलं आहे. ई-टाइम्स टीव्हीने याविषयी वृत्त दिले आहे. मीडिया अहवालानुसार मिनिस्ट्री आफ इन्फरमेशन अँड ब्रॉडकास्टिंग बांगलादेशने हे वर्क परमिट नाकारलं आहे. त्यामुळे सनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोणत्या कारणामुळे हे वर्क परमिट रद्द करण्यात आलं, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र अशा चर्चा आहेत की, काही इस्लामिक समुहांनी तिने बांगलादेशात काम करण्याबाबत आक्षेप घेतला आहे. अशीही माहिती समोर आली आहे की या संघटनांनी याविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीला मिळालं नाही वर्क परमिट

या महिन्याच्या सुरुवातील या सिनेमातील भारतीय कलाकारांना बांगलादेशाच्या  इन्फरमेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने सोल्जर सिनेमाच्या शूटिंगसाठी परवानगी दिली होती. एकूण 11 भारतीय कलाकार यात होते. शूटिंग करणाऱ्यांच्या यादीत सनी लिओनीचे देखील नाव होते, पण तिला परवानगी नाकारण्यात आली आहे. तर 10 कलाकारांना शूटिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मीडिया अहवालानुसार, ही परवानगी  5 मार्च ते 4 डिसेंबरपर्यंत शूटिंग करण्यासाठी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शमीम अहमद रोनी करत आहेत. 2015 साली देखील सनी लिओनीसह असाच प्रकार घडला होता. ती बांगलादेशमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होऊ शकली नव्हती कारण इस्लामिक समुहांनी यासंदर्भात विरोध दर्शवला होता.

हे वाचा-'पुष्पा' नंतर समंथाचा भाव वाढला, आगामी चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके कोटी

या अभिनेत्रीने बांगलादेशी म्युझिक व्हिडीओ ‘Dustu Polapan’ मध्ये देखील काम केले आहे. ज्याची इंटरनेटवर तुफान चर्चा झाली. त्यावेळी देखील अभिनेत्रीला काही बांग्लादेशी गटांकडून नाराजी सहन करावी लागली होती. सध्या सनी लिओनी 'अनामिका' या तिच्या MX प्लेअरवरील वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 10 मार्च रोजी ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.

First published:

Tags: Sunny Leone