समंथा प्रभू साऊथच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साऊथच नव्हे तर आता जगभरात समंथाचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. समंथाने 'पुष्पा' या चित्रपटात 'ओ अंटावा' आयटम सॉन्ग करत सर्वांनाच थक्क केलं होतं. पुष्पामधील या जबरदस्त गाण्याने समंथाच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली आहे. जसजसं लोकप्रियता वाढत आहे, तसतसं अभिनेत्रीचं मानधनसुद्धा वाढत असल्याचं लक्षात आलं आहे. पुष्पाच्या आधी समंथा आपल्या एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये इतकं मानधन घेत होती. परंतु अभिनेत्रीने पुष्पामध्ये फक्त एका गाण्यासाठी तब्बल दीड कोटी घेतले होते. हे गाणं जबरदस्त हिट ठरलं. त्यांनतर समंथाने आपलं मानधनही वाढवलं आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, समंथाने आपल्या आगामी 'यशोदा' या चित्रपटासाठी तब्बल 3 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.