मुंबई, 27 डिसेंबर- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या तिच्या 'मधुबन में राधिका नाचे' (Madhuban Mein Radhika) या नवीन गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या या नवीन गाण्यावरून रिलीज झालेल्यापासून नवा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातील सनी लिओनीच्या बोल्ड डान्स मूव्हवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर ट्विटरवर Arrest Sunny Leone ट्रेंड करत आहे. तिच्या विरूद्ध सोशल मीडियावर कमेंटचा महापूरच आला आहे. नेटकरी तिच्यावर हिंदूंच्या भावनांशी खेळल्याचा आरोप करत तिला अटक करण्याची मागणी करत आहेत.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सनी लिओनील अटक करण्याची मागणी होत आहे. यासासोबतच बिग बॉसचा होस्ट सलमान खानवर(Salman Khan) देखील नेटकरी चांगलेच भडकले आहेत. सनी या गाण्याच्या प्रमोशनासाठी बिग बॉसमध्ये आली होती. त्यामुळे या गाण्याला सलमान खाने प्रसिद्धीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. काही नेटकरी यासाठी सलमानवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
वाचा-कुणी गेलं जेलमध्ये तर कुणी झालं ट्रोल; पाहा कसं गेलं सेलिब्रिटींचं 2021 वर्ष
एका यूजरने लिहिले आहे की, 'सनी लिओनीने सनातन धर्माचा अपमान केला आहे. या गाण्याच्या माध्यमातून राधाच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सनी लिओनीसहीत या गाण्याशी संबंधित सर्व लोकांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येते. त्याचवेळी आणखी एका यूजरने ट्विट करत लिहिले की, 'हिंदूंच्या भावनांशी सातत्याने खेळ केला जात आहे. हा घाणेरड्या आयटम नंबरला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले पाहिजे.
#biocouttSunnyLeone Sunniloni has insulted Sanatan Dharma, has thrown mud on the character of Goddess Radha, so #Arrest_Sunny_Leone and every person who behind the song.....😡😠😠 pic.twitter.com/tQ8WkBAqXj
— Lipsa 🇮🇳🇮🇳 🚩🚩 (@BastiaLipsa) December 27, 2021
ज्या गाण्यामुळे सनी लिओनी चर्चेत आले आहे ते गाणे 1960 मध्ये आलेल्या 'कोहिनूर' चित्रपटातील 'मधुबन में राधिका नाचे' या गाण्याचा रिमेक आहे. हे गाणे लोकप्रिय गायिका कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे.
तर गणेश आचार्य यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे गाणे भगवान कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमावर आधारित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Sunny Leone