नवीन वर्ष तोंडावर आलं असलं तरी आताच्या घडीला आपण 2021 मध्येच जगत आहे. येणारे वर्ष कसं असणार हे माहित नाही. मात्र 2021 हे साल प्रत्येकाच्या दृष्टीने काहींना काही देऊन गेलं तर काहींच हिरावून घेतलं. मात्र 2021 बॉलिवूडकरांसाठी काहीस वादाने भरलेले राहिले. बॉलिवूडमधील काही मंडळीना तर या वर्षाच नाव देखील पुन्हा आपल्या आयुष्यात येऊ नये असं वाटत असेल. कारणही तसेच आहे आतापर्य़ंतच्या वर्षात 2021 हे वर्ष बॉलिवूडसाठी सर्वात वादग्रस्त असेल. यंदा एकापेक्षा एक सेलेब्स कोणत्या कोणत्या कंट्रोवर्सीमुळे चर्चेत होते.
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 2021 हे वर्ष त्याच्या आय़ुष्यात डिलीट करणे पसंद करेल. 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीने आर्यन खानला गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधून ताब्यात घेतले आणि तिथून आर्यनच्या आय़ुष्यातील सर्व ग्रह तारेच फिरले असेच म्हणावे लागेल. अटक झाल्यानंतर आर्यन खानही तुरुंगातच होता. आर्यनवर ड्रग्ज पुरवल्याचा आणि कटात सहभागी असल्याचा आरोप होता. शाहरुखने आपल्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. खूप प्रतिक्षेनंतर आर्यनला जामीन मिळाला. त्याला या जामिनासाठी खूप झगडावे लागले. सध्या ते जामिनावर बाहेर आहे. मात्र या काळात सोशल मीडियावर फक्त आर्यन खानचे नाव चर्चेत होते. या काळात त्याच्या सपोर्टमध्ये सर्व बॉलिवूड उतरले होते.
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची नवरा यांने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्याला तुरुंगाची हवा खायला लागेल. राज कुंद्राला पोर्नोग्रापी प्रकरणी अटक झाली आणि त्याला किती तरी दिवस तुरूंगाची हवा खावी लागली. या काळात शिल्पा शेट्टी देकील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. तसेच तिच्यावर देखील आरोप झाले मात्र पोलिसांकडून तिला क्लिनचीट मिळाली आहे. मात्र तिनं देखील या काळात संयम पाळला. आता राज कुंद्रा जामिनावर बाहेर आला आहे.
झिझवाव्या लागल्या. आर्यन प्रकरणी तिची देखील चौकशी करण्यात आली. करीना नेहमी तिच्या मुलांच्यामुळे चर्चेत असते. यंदा देखील करीनाने दुसरा मुलगा जेहला जन्म दिला. त्याच्या नावावरून देखील करीनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या मुलाचे पूर्ण नाव जहांगीर आहे. जहांगीर नाव ठेवण्यावरून ती वदाच्या भोवऱ्यात सापडली होती
सैफ अली खानचा पॉलिटिकल ड्रामा तांडव वरून देखील मोठे तांडव झाले. सीरीजच्या एका सीनवर लोकांनी नाराजी व्यक्त केली. पर जमकर तांडव हुआ था. सीरीज के एक सीन पर लोगों को विवाद था. अभिनेता मोहम्मद जीशान अयुब देवाचा पोशाख परिधान करून स्वातंत्र्याचा नारा देत होता. हे दृश्य पाहिल्यानंतर लोकांनी त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. निर्माते आणि स्टारकास्ट विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. निर्मात्यांनी नंतर माफी मागितली आणि वादग्रस्त दृश्य काढून टाकण्यास सहमती दर्शवली.
कार्तित आर्यनचे एकामागून एक सिनेमे येत आहेत आणि हिट देखील होत आहेत. चित्रपट निर्मात्यांची कार्तिक आर्यन पहिली पसंत आहे. अशातच बातमी आली की कार्तिकला अचानक सिनेमातून डच्चू देण्यात आला आहे. कार्तिकला करण जोहरच्या दोस्ताना -2 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सिनेमाचे 50 टक्के शूटिंग पूर्ण झाले होते तेव्हा त्याला या सिनेमातून काढून टाकण्यात आले. प्रोडक्शन हाउसने नवीन स्टारकास्ट जाहीर करून टाकली.
मनोज बाजपेयीची वेब सीरीज फॅमिली मॅन 2 ने यंदा चांगलाच धुमाकूळ घातला. मात्र या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच त्यावरुन वाद निर्माण झाला होता. खास करुन दाक्षिणात्य राज्यांमधून विशेष करुन तमिळ लोकांकडून या वेब सिरीजला विरोध होताना दिसला. वेब सिरीजचा ट्रेलरसमोर आल्यानंतरच अनेकांना या वेब सिरीजमध्ये तमिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आल्याचा आरोप केला. तमिळ लोकांची नकारात्मक प्रतिमा या वेब सिरीजमुळे तयार होईल असा आरोप अनेकांनी केला. या वेब सिरीजचं कथानकामध्ये श्रीलंकेतील ईलम तमिळ समाजाला आणि ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलम’ (एलटीटीई) चुकीच्या अर्थाने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. समांथाच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला होता. तिनं नंतर याबद्दल माफी मागितली होती.
कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यंदा 2021मध्ये शेतकरी आंदोलनावरून पंजाबी अभिनेता दिलजीत दोसांझ आणि कंगाना राणावत यांच्यात चांगलीच झुंपली. या दोघांच्यात वाद रिहानाच्या ट्वीटवरू झाला. यानंतर दोघांच्यात ट्वीटर वॉर रंगलेले पाहण्यास मिळाले.दिलजीतने रिहानाला पाठिंबा देण्यासाठी एक गाणं देखील रिलीज केले होते. तेव्हापासून कंगना चांगली पेटली होती.