मुंबई, 04 एप्रिल: अभिनेत्री सनी लिओनी हिने बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात आपला जम बसवला आहे. या अभिनेत्रीची जवळपास सर्व साँग्ज हिट होतात. अशावेळी, जेव्हा बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्स भाड्याच्या घरात राहत असताना अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone New House in Mumbai) हिने स्वत:चं घर खरेदी केलं आहे आणि ते देखील मुंबईमध्ये! सनी लिओनी हिने गेल्यावर्षीच तिचा पती डॅनियल वीबर (Daniel Weber) याच्यासह हे घर विकत घेतलं आहे. मुलांना एक व्यवस्थित बेस मिळावा, याकरता घर खरेदी केल्याचं सनी सांगते. बॉलिवूमध्ये गेल्या एका दशकापासून असणारी सनी आतापर्यंत मुंबईत एका भाड्याच्या घरात राहत होती, आता तिने स्वत:चं असं स्वप्नातलं घर खरेदी केल आहे. सनी लिओनीने खरेदी केलेल्या या मुंबईतील 3 बेडरुम पेंट हाऊसची (Sunny Leone New House Price) किंमत जवळपास 16 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे.
हे वाचा-माधुरी दीक्षित ते विकी-कतरिना... कोट्यवधी कमावूनही भाड्याच्या घरात राहतात हे बॉलिवूड सुपरस्टार्स!
सनी लिओनी सध्या दक्षिणेकडील काही प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. तिने मुंबईत घर घेण्याबाबत अशी प्रतिक्रिया दिली की, 'याठिकाणी घर घेण्याचा आमचा निर्णय इमोशनल होता. भारत देश आमचे प्राथमिक घर आहे ज्याठिकाणी आम्ही सर्वाधिक वेळ व्यथित केला आहे. आमची तीन मुलं आहेत आणि आम्हाला असे वाटले की केवळ एका अपार्टमेंटमधून दुसरीकडे शिफ्ट होताना आम्ही त्यांना व्यवस्थित स्थेर्य नाही देत आहोत. आम्ही आमच्या मुलांना अशी स्पेस देऊ इच्छितो, ज्यावर ते प्रेम करतील. जर तुम्ही आमच्या घरात येऊन पाहिलं तर तुम्हाला समजेल की हे घर अमेकिकन शैलीत बनले आहे.'
सनी पुढे म्हणाली की, 'आता वेळ आली होती की आम्ही काही गोष्टी कायमस्वरूपी कराव्यात. माझी मुले देखील यावेळी आणि या नवीन घराचा खूप आनंद घेत आहेत. कारण त्यांना त्यांच्या बाइक चालवण्यासाठी आणि बागेत खेळण्यासाठी पुरेशी जागा मिळत आहे. स्विमिंग पूलसह इतर अनेक सुविधांवर काम सुरू आहे. हे एक फूल सर्व्हिस अपार्टमेंट आहे. यात मला माझ्या मुलांसाठी चिंतित राहण्याची आवश्यकता नाही.'
हे वाचा-डिलिव्हरीच्या एक दिवस आधी काय करत होती भारती सिंह, VIDEO आला समोर
दहा वर्षांचा प्रवास
सनी लिओनी भारतात गेली दहा वर्ष काम करत आहे. ती म्हणाली की, 'हा प्रवास माझ्यासाठी पूर्णपणे अनियोजित होता. जेव्हा मी बिग बॉसच्या घरात होते ते आज मुंबईत घर घेण्यापर्यंतचा प्रवास खूप छान होता. मी आणि डॅनियल अनेकदा अशा गोष्टींबद्दल बोलतो की आम्ही अशा गोष्टी करत आहोत ज्या आम्हाला करायच्या नव्हत्या. आम्ही मुंबईत घर घेऊ असं कधीच वाटलं नव्हतं. मी एक मुलगी दत्तक घेतली आहे आणि दोन जुळ्या मुलांचे संगोपन करत आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Sunny Leone