जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सैफ आधी सनी देओलच्या प्रेमात होती साराची आई; अभिनेत्याचं 'ते' गुपित समजताच तिने कायमचं तोडलं नातं

सैफ आधी सनी देओलच्या प्रेमात होती साराची आई; अभिनेत्याचं 'ते' गुपित समजताच तिने कायमचं तोडलं नातं

सनी देओल- अमृता सिंग

सनी देओल- अमृता सिंग

सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली होती. पण सनी देओलबद्दल एक सत्य समजल्यानंतर अमृता सिंगने त्याच्यासोबतचे नाते तोडले. काय होता तो किस्सा जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 मे : 80 च्या दशकात बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली होती. या दोघांनी आपल्या करिअरमधील पहिल्या चित्रपट ‘बेताब’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि दोघांच्या जोडीने कमाल केली. या चित्रपटात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्याच वेळी दोघांनीही एकमेकांवर गुपचूप प्रेम करायला सुरुवात केली होती, पण सनी देओलबद्दल एक सत्य समजल्यानंतर अमृता सिंगने त्याच्यासोबतचे नाते तोडले. काय होता तो किस्सा जाणून घ्या. अमृता सिंग 80 च्या दशकात खूप लोकप्रिय अभिनेत्री बनली होती. तिने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र सनी देओलच्या प्रेमात पडल्यानंतरही तिने तिच्या करिअरवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. दोघांचे प्रेम हे सगळ्यांसाठी गुपित होते, दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगलं.अमृता सिंग आणि सनी देओल या सुपरहिट जोडीने ‘बेताब’ शिवाय आणखी एका चित्रपटात एकत्र काम केले होते आणि याच दरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले होते. अमृताने सनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर सनीचे असे सत्य तिच्यासमोर आले कि तिने ते नातं कायमच संपवलं. एका फोटोने दोघांचं प्रेम संपवलं.

News18लोकमत
News18लोकमत

‘बेताब’ चित्रपटात काम केल्यानंतर अमृता सिंग आणि सनी देओलची जवळीक वाढू लागली. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते आणि ते प्रेमात पडले होते. ‘बेताब’ चित्रपटाच्या सेटवर अमृता सनीसोबत बराच वेळ घालवत असे. होते. पण त्या काळात लोकांची गुपिते इतक्या सहजासहजी उघड होत नव्हती. अमृतालाही सनीचे एक गुपित माहीत नव्हते. ते गुपित म्हणजे सनी विवाहित होता हे तिला माहित नव्हतं. अभिनेत्रीने मासिकात सनी देओलच्या लग्नाचा फोटो पाहिला आणि अमृताच्या पायाखालची जमीन सरकली. जणू तिच्या आयुष्यात वादळ आले. सनीच्या लग्नाची माहिती मिळताच तिने स्वत:ला अभिनेत्यापासून दूर केले आणि दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. Jawan : शाहरुखचा जवान पाहण्यासाठी चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा; या दिवशी रिलीज होणार चित्रपट सनी देओलच्या करिअरवर परिणाम होऊ नये, म्हणून धर्मेंद्र यांनी सनीचे लग्न सर्वांपासून गुप्त ठेवले होते. त्याचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याला सनीच्या लग्नाची चर्चा बाहेर येऊ द्यायची नव्हती. अमृता आणि सनीच्या अफेअरच्या बातम्या झपाट्याने पसरू लागल्यावर या गोष्टीचा फायदा चित्रपटालाही झाला. यामुळेच जेव्हा अमृताच्या एका मुलाखतीत या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले तेव्हा तिने चित्रपटाचा पब्लिसिटी स्टंट म्हणून या अफवा उठवल्याचे सांगितले. अमृता तिच्या करिअरबाबत खूप गंभीर होती, तिने याचा परिणाम तिच्या करिअरवर होऊ दिला नाही. या घटनेनंतर तिने तिच्या करिअरमध्ये प्रगती केली आणि स्वतःला सनीपासून दूर केले. सनी देओलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सनीच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे. अभिनेत्याने आपल्या लग्नाची बाब सर्वांपासून गुप्त ठेवली होती. आपल्या मुलाच्या फिल्मी करिअरवर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून अभिनेत्याचे वडील धर्मेंद्र यांना ही गोष्ट सर्वांसमोर आणायची नव्हती. लग्नानंतर पूजा त्यावेळी लंडनमध्ये तर सनी भारतात राहत होता. चित्रपटांच्या व्यस्त शेड्युलमधून ब्रेक घेऊन सनी तिला भेटायला जायचा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात