मुंबई, 24 जुलै : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक नवीन कलाकारांची एन्ट्री झाली होती. शाहरुख खान ते अक्षय कुमारसारखे स्टार्स या काळात लाइमलाइटमध्ये आले आणि काही वेळातच इंडस्ट्रीचे सुपरस्टार बनले. आजही हे कलाकार बॉलिवूडवर राज्य करतात. अजय देवगण, सलमान खान, आमीर खान हे देखील त्याच काळातील हिरो आहेत, त्यांचं बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान आहे. पण, 90 च्या दशकात आणखी एक हिरो होता, ज्याचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. हा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याचा ‘गदर 2’ लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 90 च्या दशकात सनीचा जवळपास प्रत्येक चित्रपट हिट ठरला होता. 90 च्या दशकात सनी देओलचे घातक, घायल, जिद्दी, बॉर्डर, सलाखें आणि दामिनी हे चित्रपट रिलीज झाले. या चित्रपटांनी अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. घायल (1990) 20 कोटी, घातक (1996) 84 कोटी, जिद्दी (1997) 29.25 कोटी, सलाखें (1998) 18.58 कोटी, बॉर्डर (1997) 39 कोटी आणि दामिनी (1993) ने बॉक्स ऑफिसवर 11 कोटींहून अधिक कमाई केली होती. एकंदरीत सनी देओलच्या चित्रपटांनी 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. हेही वाचा - 1957चा ब्लॉकबस्टर सिनेमा, 60 कोटींचं बजेट अन् कमावले 8 लाख, 3 बॉलिवूड स्टार झाले सुपरस्टर ‘दामिनी’ हा 1993 मध्ये आला होता. या चित्रपटाने अनेक नवे विक्रम रचले होते. ऋषी कपूर, मीनाक्षी शेषाद्री, अमरीश पुरी आणि परेश रावल यांसारख्या दिग्गजांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे डायलॉग खूप गाजले. एका मोलकरणीच्या बलात्काराच्या कथेभोवती फिरणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे प्रेक्षकांनी व समीक्षकांनीही भरभरून कौतुक केलं होतं.
सनी देओलचे फेमस डायलॉग दामिनी चित्रपटाचा तो सीन ज्यात सनी देओल अमरीश पुरींना म्हणतो,- ‘चिल्लाओ मत, नहीं तो ये केस यहीं रफा-दफा कर दूंगा. ना तारीख, ना सुनवाई सीधा इन्साफ, वो भी ताबड़तोड़’ आणि ‘तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है. लेकिन, इन्साफ नहीं मिला माय लॉर्ड, इन्साफ नहीं मिला, मिली है तो सिर्फ ये तारीख’ या डायलॉगवर थिएटरमध्ये टाळ्यांचा वर्षाव व्हायचा. सनी देओलचे डायलॉग जबरदस्त असतात. त्याच्याशिवाय त्याचे वडील धर्मेंद्र आणि विनोद खन्नाही असे अभिनेते होते ज्यांच्या पर्सनॅलिटीला असे हाणामारीचे डायलॉग शोभायचे. घायल व घातक चित्रपट रिलीज झाल्यानंतर सिनेमागृहांबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, आता सनी देओल लवकरच त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सीक्वेल घेऊन येतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट ऑगस्ट महिन्यात रिलीज होईल.