मदर इंडिया हा सिनेमा 20 ऑक्टोबर 1957 साली रिलीज झाला. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. नरगिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार आणि राज कुमार यांच्या सिनेमात महत्त्वाच्या भुमिका आहेत. 1940मध्ये आलेल्या औरत सिनेमाचा हा रिमेक होता. जो रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर घुमाकूळ घालून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, मदर इंडिया सिनेमा तयार करण्यासाठी केवळ 60 लाख रूपये खर्च आला होता. सिनेमानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर 8 कोटींचा गल्ला जमवला. 50च्या दशकात कोटींची कमाई करणारा मदर इंडिया हा एकमेव सिनेमा होता. सुनील दत्त, राजेंद्र कुमार आणि राज कुमार हे कलाकार या सिनेमातून सुपरस्टार झाले.
सिनेमाची कथा ही राधा नावाच्या एका गरीब त्रस्त ग्रामीण भागातील महिलेची आहे. पती अनुपस्थितीमध्ये ती आपल्या मुलांचा सांभाळ करतेय. येणाऱ्या संकटांचा सामना करतेय.
मदर इंडिया हा सिनेमा मोठ्या धामधुमीत भारतात रिलीज करण्यात आला होता. अनेक ठिकाणी सिनेमाचं हाय प्रोफाइल स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीमध्ये देखील सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. ज्याला तेव्हाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हजेरी लावली होती. भारतातील सर्वश्रेष्ठ सिनेमाचा मान मदर इंडिया सिनेमाला मिळाला होता.
सिनेमात राधाची भुमिका अभिनेत्री नरगिसनं साकारली होती. एका आदर्श भारतीय महिला तिनं साकारली होती. राधाचा लहान मुलगा बिरजू विद्रोही होतो. डाकू होणं पसंत करतोय. ही भुमिका अभिनेता सुनील दत्तनं साकारली. तर राधाचा मोठा मुलगा रामू आपल्या आईच्या इच्छेनुसार सदाचाराची मार्ग अवलंबतो. ही भुमिका अभिनेता राजेंद्र कुमार यांनी साकारली. तर राधाचा नवरा शामूच्या भुमिकेत राज कुमार होते.