मुंबई, 24 एप्रिल : बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुलचे सासरे बनले आहेत. अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारीला खंडाळ्यात विवाहबद्ध झाले होते. त्यांच्या या लग्नाची सगळीकडेच चर्चा आहे. सुनील शेट्टी के.एल. राहुलला आपल्या मुलासारखंच मानतात. प्रत्येक कार्यक्रमात ते जावयाचं कौतुक करताना देखील दिसतात. आता सुनील शेट्टीने जावई केएल राहुल आणि क्रिकेटर हार्दिक पंड्या यांच्या ‘कॉफी विथ करण’च्या वादग्रस्त प्रकरणावर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. त्यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.. सुनील शेट्टींची ‘हंटर-टुटेगा नही, तोडेगा’ ही वेब सिरीज नुकतीच अॅमेझॉन मिनीवर रिलीज झाली आहे. याच्याच प्रमोशनसाठी सुनील शेट्टी यांनी नुकताच रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान जेव्हा सुनील शेट्टीला कॉफी विथ करण सीझन 6 च्या त्या भागाबद्दल विचारण्यात आले तेव्हा जावई केएल राहुलचा बचाव करताना त्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि करण जोहरवर निशाणा साधला. आता एका मुलाखतीदरम्यान सुनील शेट्टीने ‘कॉफी विथ करण’ सीझन 6 मधील केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्या वादग्रस्त मुलाखतीवर पहिल्यांदाच आपले मत मांडले.
कॉफी विथ करण मध्ये घडलेल्या या प्रकरणावर आपलं मत मांडताना सुनील शेट्टी म्हणाले कि, ‘हार्दिक भलताच भरकटला असेल, पण जेव्हा अँकर तुम्हाला असा प्रश्न विचारत असेल, तेव्हा तू काय करणार? त्यामुळे मुलांना उत्तेजित करणे आणि ते असे काही बोलले की बॉलीवूडवर बंदी घालणे हे या शोचे स्वरूप आहे. Shah Rukh Khan: ‘मन्नत’ वर आलेल्या मॉडेलला शाहरुखने दिली अशी वागणूक; तिने पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव सुनील शेट्टी पुढे म्हणाले, ‘मला वाटते की आपण अँकर म्हणून आणि पाहुणे म्हणून जबाबदार असणे आवश्यक आहे कारण तुम्ही मला असे प्रश्न विचारता, ज्याचे मला उत्तर द्यायचे नाही, याचा अर्थ मी कोणापेक्षा कमी आहे असा नाही. जेव्हा हे घडते, तेव्हाच अशा गोष्टी घडतात ज्या घडू नयेत. गोष्टी जसे आहेत किंवा असायला हव्यात तसे बोलण्याचे धैर्य तुमच्यात असले पाहिजे.’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 2019 मध्ये करण जोहरच्या कॉफी विथ करण 6 या चॅट शोमध्ये हार्दिक पांड्या आणि केएल राहुल पाहुणे म्हणून आले होते. या एपिसोडवरून बराच गदारोळ झाला होता. वास्तविक, केएल राहुलने जास्त बोल्ड स्टेटमेंट दिले नाही, पण हार्दिकने अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याची कबुली दिली होती. यानंतर या शोवर जोरदार टीका झाली होती. तसंच दोन्ही क्रिकेटपटूंना प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुनील शेट्टी लवकरच हेरा फेरी 3 या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल यांच्यासोबत दिसणार आहे. अभिनेता शेवटचा एमएक्स प्लेयरच्या धारावी बँक शोमध्ये दिसला होता, ज्यामध्ये त्याने विवेक ओबेरॉयसोबत स्क्रीन शेअर केली होती.