मुंबई, 26 जानेवारी- चित्रपट निर्माते सुनील दर्शन (Suneel Darshan complaints Sundar Pichai and Google) यांनी ‘एक हसीना थी एक दीवाना था’ या त्यांच्या चित्रपटाबाबत एक मोठं पाऊल उचलेले आहे. यूट्यूबवर (YouTube) होणाऱ्या या चित्रपटाचे कॉपीराईट रोखण्यासाठी त्यांनी कायदेशीर मार्ग निवडलेला आहे. व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर काही यूजर्स त्यांच्या विशेष कंन्टेटला मॉनीटाईज करत असल्याचा आरोप सुनिल दर्शन यांनी केला आहे. यामुळे त्यांचे मोठं नुकसान झालं आहे. तक्रारीमध्ये त्यांनी गुगलचे (Google) के सीईओ सुंदर पिचाई आणि काही कर्मचाऱ्यांचे नाव लिहिले आहे. सुनील दर्शन यांनी ईटाईम्ससोबत बोलताना सांगितले की, माझा चित्रपट, मी अद्याप अपलोड देखील केलेला नाही. शिवाय जगभरात कुणाल विकला देखील नाही. मात्र हा सिनेमा यूट्यूबवर (YouTube) लाखाच्या वर पाहिला आहे. हा सिनेमा यावरून काढून टाकावा अशी मी गुगलकडे मागणी केली मात्र मला काहीचं उत्तर मिळालं नाही. यामुळे मी खूप निराश झालो होते. माझ्याकडे कोणताच पर्याय उरलेला नाही त्यामुळे मी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. वाचा- माझी तुझी रेशीमगाठ फेम छोट्या परीचा सेटवरील टाईमटेबल माहिती आहे का? कोर्टाने पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा दिला होता आदेश सुनील दर्शन पुढे म्हणाले की, सुदैवाने न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिला आणि पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला. एक बिलियनपेक्षा जास्त उल्लंघन केल्याच्या तक्रारी माझ्याकडे आहे आणि त्याचा रेकॉर्ड देखील माझ्याकडे आहे. हे त्यांच्यासठी आहे, जे सांगतात की आम्ही कायद्याचे पालन करतो मात्र त्यांच्याकडे अशी कोणती सिस्टिमच नसते. सुनिल दर्शन टेक्नॉलॉजीचं होणारं नुकसान याबद्दल बोलताना म्हणाले की, माझ्या व्हिडिओतून कमाई करणाऱ्यांचा फायदा होत आहे. मी टेक्नॉलॉजीला चॅलेंज करत नाही. मात्र याचा चुकीचा वापर कसा होता याबद्दल लक्षात आणून देत आहे.
सुनील दर्शन यांच्या वकिलांनी सांगितलं सर्व प्रकरण सुनील दर्शन यांचे वकील आदित्य यांनी कायद्याच्या दृष्टीने याबद्दल सांगितलं की, ‘एक हसीना थी एक दीवाना था’ या सिनेमाचे ऑडिओ-व्हिज्युअल अपलोड केल्याने यूट्यूब आणि त्यांच्या अधिकारी वर्गाने इनटॅलेक्चुअल प्रॉपर्टी कमी केलेली नाही तर मार्केचेबिलिटी देखील कमी केली आहे. तसेच चित्रपटाची ऑडिओ- व्हिज्युअल आणि ऑडिओ व्ह्यालू देखील कमी केली आहे. वाचा- Neha ने शेअर केला BIKINI लुक! रामचरणसोबत लग्नाच्या चर्चेने वेधलं होतं लक्ष सुनील दर्शन यांनी अनेकवेळा केली होती तक्रार वकील पुढे म्हणाले की, सुनील दर्शन यांनी यूट्यूब आणि गुगल आणि त्यांच्या अधिकारी वर्गाच्या विरोधात अनेकवेळा तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी यामाध्यमातून चुकीच्या मार्गाने पैसे कमावणे सुरूच ठेवले.