तसेच सौम्या म्हणते 2017 मध्ये मी गर्भवती होते. आणि मी माझा आईवडिलांच्या जवळ व्हर्जिनियाला जाण्याआधी आत्महत्या करण्याचे मार्ग शोधत होते. मात्र त्यावेळी मला माझा आई वडिलांनी धीर दिला. आणि मला या सर्वातून बाहेर पडण्यास मदत केली. त्यावेळी मी आरशासमोर उभी राहिले मात्र मला स्वतःला ओळखणं सुद्धा कठीण होतं. कारण मी पूर्णपणे जखमांनी भरलेले. मी गर्भवती असूनसुद्धा कित्येक दिवस जेवत नव्हते. जेव्हा जेव्हा मी स्वतःला बघत मला आत्महत्या करावीशी वाटत. (अवश्य वाचा: मुंबई फिरायला आली अन् झाली अभिनेत्री; पाहा रतन राजपूतचा अजब प्रवास) सौम्याने 2017 मध्ये अरुण कपूर या व्यक्तीशी लग्नं केलं होतं. मात्र सौम्याला या लग्नातून दुखचं मिळाल्याचं तिनं बऱ्याचवेळा सांगितलं आहे. सौम्या कौटुंबिक हिंसाचारला बळी पडली होती. तिनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल खुलासा केला होता. सौम्याने 2019 मध्ये आपल्या पतीशी घटस्फोट घेतला आहे. ती सध्या यूएसएमध्ये आपल्या मुलांसोबत राहते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tv actress