मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमिताभ बच्चन यांनी बाबिलला दिल्या बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा; म्हणाले...

अमिताभ बच्चन यांनी बाबिलला दिल्या बॉलिवूड पदार्पणासाठी शुभेच्छा; म्हणाले...

केबीसीच्या सेटवर असणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला निर्धारित नियमांचं पालन करावं लागतं. कोणताही स्पर्धक जो जिंकला किंवा हरला असेल, शूटिंग संपण्यापूर्वी त्याला सेट सोडून जाण्याची परवानगी नसते. (फोटो सौजन्य : Instagram/ @amitabhbachchan)

केबीसीच्या सेटवर असणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला निर्धारित नियमांचं पालन करावं लागतं. कोणताही स्पर्धक जो जिंकला किंवा हरला असेल, शूटिंग संपण्यापूर्वी त्याला सेट सोडून जाण्याची परवानगी नसते. (फोटो सौजन्य : Instagram/ @amitabhbachchan)

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबीलचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीचं त्याचं सर्वांकडून कौतुक होतं आहे. अमिताभ बच्चनने सुद्धा त्याचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 20 एप्रिल:- बॉलीवूडचा (bollywood) अष्टपैलू अभिनेता म्हणून इरफान खानकडे (Irrfan Khan) पाहिलं जात होतं. इरफानच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. इरफानच्या निधनाला (Irrfan Khan death) एक वर्ष होतं आलं. त्याचा मुलगा बाबिल (Babil) सतत इरफानच्या आठवणीत पोस्ट करत असतो. बाबिलसुद्धा इरफानच्या पाऊलावर पाऊल ठेवत बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. बाबील अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) ‘काला’ (Qala) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याच निमित्ताने ‘काला’ची एक झलक पोस्ट करत बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bacchan) यांनी बाबिलला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर ‘काला’ चा टीझर शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी बाबील खानच्या बॉलीवूड पदार्पणाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर पोस्ट करत लिहिलं आहे. ‘अन्विताजी आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, हे खुपचं वेगळं दिसत आहे, टीझर बघूनचं खूप छान वाटत आहे’. बिग बी अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या नंतर बाबिलचा आनंद द्विगुणीत झाला होता. बाबिलने अमिताभ यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून आपल्या स्टोरीला पोस्ट आनंद व्यक्त केला आहे. कालाद्वारे अनुष्का शर्माची निर्मिती संस्था क्लीन स्लेट फिल्म्स पुन्हा एकदा नेटफ्लिक्स सोबत भागीदारी करत आहे. याआधी ‘बुलबुल’ सुद्धा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.
‘काला’ बद्दल सांगायचं झालं तर अन्विता दत्त यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बाबिल सोबत सहभिनेत्री तृप्ती डमरी असणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहूनचं सर्वांना उत्कंठा लागली आहे. टीझरवरून चित्रपटाचं शुटींग बर्फाळ प्रदेशात झाल्याचं दिसून येतं. चित्रपट प्रदर्शनाची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र टीझर पाहूनचं बाबिलचं सर्वांकडून कौतुक होतं आहे. (अवश्य वाचा: लॉकडाऊनमध्ये नेहा कक्करचा नवरा रोहनप्रीतसोबत असा रंगतोय रोमान्स; PHOTO VIRAL) बाबिल नुकताच फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. तेव्हा त्याने वडील इरफान खानकडून पुरस्कार स्वीकारला होता. पुरस्कार घेताना बाबिल अतिशय भावुक झाला होता. फारच कमी वयात इरफानसारख्या अभिनेत्याला कॅन्सरमुळे आपलं आयुष्य गमवावं लागलं होतं. इरफानने अनेक धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून एक सामाजिक संदेश दिला जातं होता. बॉलीवूडने एक अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. बाबिल आता आपल्या वडिलांप्रमाणे आपले अभिनय गुण दाखविण्यास सज्ज आहे. चाहत्यांकडून बाबिलला कसं प्रेम मिळत पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: Amitabh Bachchan, Anushka sharma, Babil, Bollywood, Entertainment, Irrfan khan, Qala, Upcoming movie

पुढील बातम्या