मुंबई, 15 सप्टेंबर : कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक वर्ष झाले तरी आजही ही मालिका प्रेक्षक आवडीने बघतात. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. खास करून मालिकेचा नायक अभिमन्यू आणि नायिका लतिका यांची जोडी सर्वांची आवडती आहे. मालिकेत सतत नवीन ट्विस्ट येत असतात. आता कुठे अभ्याची केसमधून सुटका झाली होती. मालिकेत सगळं सुरळीत चालू होणार होतं. तर आता मालिकेला वेगळंच वळण लागणार आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिका मोठा लीप घेणार आहे. मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये मालिकेचं कथानक पाच ते सहा वर्ष पुढे जाणार असल्याचं दिसतंय. कलर्स मराठीने मालिकेचा एक प्रोमो पोस्ट केला आहे. त्यामध्ये मालिकेचं कथानक बरेच वर्ष पुढं सरकलं आहे. प्रोमोमध्ये अभ्या आणि लतिकाची छोटी मुलगी दाखवली आहे. ती लाटिकासारखीच आहे. पण तिने लतिकाला विचारलेल्या एका प्रश्नामुळे मालिकेत अभ्या असणार कि नाही याबद्दल प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्या मुलीला सगळे ‘ढोली’ म्हणून चिडवत असतात. तेव्हा ती चिडून लतिकाला म्हणते, ‘‘तू देवबाप्पाला सांग कि माझ्या बाबाला खाली पाठवून दे.’’ हे ऐकून लतिका भावुक होते.
हा प्रोमो पाहून अभ्याने मालिकेतून एक्झिट घेतल्याची शक्यता आहे. आता सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत लतिका आणि तिच्या मुलीचा प्रवास दाखवला जाणार आहे. पण लति आणि अभ्याची जोडी मात्र आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. लतिकाचं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे. ती मुलीला कशी वाढवते, सगळ्या संकटाना कशी मात देते हे मालिकेत पाहायला मिळेल. हेही वाचा - Sukh mhnaje nakki kay asta : अखेर शालिनीच्या पापांचा घडा भरणार; जयदीप गौरी देणार ‘ही’ शिक्षा मध्यंतरी अभ्याने म्हणजेच समीर परांजपेने अक्षया आणि त्याचे छान फोटो पोस्ट करत त्याला ‘मिस यु’ असे कॅप्शन दिले होते. तेव्हाच काही प्रेक्षकांनी अभ्या मालिकेत एक्झिट घेणार याचीशक्यता वर्तवली होती. आता मात्र नवीन प्रोमो पाहून हे कन्फर्म झालं आहे. त्यामुळे प्रेक्षक लाडक्या अभ्याला इथूनपुढे मिस करणार आहेत.
अभ्या आणि लतिकाला बघायला प्रेक्षकांना आवडतं. ह्या दोघांचं नातं अपघातानेच सुरु झालं होतं . पण त्यांच्या नात्याचं नंतर मैत्रीत आणि प्रेमात रूपांतर झालं. हा सगळा प्रवास प्रेक्षकांनी अनुभवला होता. आता अभ्याची एक्झिट नेमकी कशी होणार. त्याला नक्की काय होत, दौलत अभ्याला काही करतो का या प्रश्नांची उत्तरं तर मालिकेच्या आगामी भागांमध्येच मिळतील. पण आता अभ्या आणि लतिकाच्या जोडीला इथूनपुढे प्रेक्षक मिस करणार हे नक्की.