मुंबई, 14 सप्टेंबर : स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या सगळं वातावरण चांगलं आहे. गौरी आणि जयदीप यांचा सुखाचा संसार चालू असला तरी शालिनी त्यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करते. गौरी आणि जयदीप यांच्यात दुरावा निर्माण करण्यासाठी ती सतत काही ना गोष्टी धडवून आणत असते. पण ही दोघे सगळ्या संकटांचा सामना करतात. शालिनीने आता गौरीचं नाही तर तिच्या होणाऱ्या बाळाला देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला. गौरीच्या डोहाळजेवणाच्या वेळी तिला झोक्यावरून खाली पडण्याचा कट शालिनीने रचला होता. पण गौरी त्यातून सुखरूप बचावली. पण आता जयदीप आणि गौरीला शालिनीचा सगळा डाव कळला आहे. आणि ते दोघेही शालिनीला चांगलाच धडा शिकवणार आहेत. मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. टीआरपी मराठीने टाकलेल्या प्रोमोनुसार मालिकेच्या आगामी भागांमध्ये गौरी आणि जयदीप मिळून शालिनीला शिक्षा आहेत. हे दोघे शालिनीला चक्क किडनॅप करणार आहेत. या प्रोमोमध्ये जयदीप आणि गौरी अम्मांच्या मदतीने शालिनीला किडनॅप करतात. तिचे हातपाय बांधलेले आहेत आणि तिच्या तोंडाला देखील पट्टी बांधली आहे. गौरी आणि जयदीप असं वागताना पाहून शालिनीला चांगलाच धक्का बसला आहे. जयदीप शालिनीला चक्क पोलिसात देण्याची धमकी देतोय.
प्रोमोमध्ये गौरी शालिनीला म्हणते, ‘तुम्हाला शिक्षा मिळायलाच हवी. तुम्ही आतापर्यंत जी पापं केली आहेत त्यांची जबरी शिक्षा तुम्हाला मिळायला हवी.’ तेवढ्यात जयदीप म्हणतो, ‘गौरीला तुम्हाला अजून एक संधी द्यायची आहे. तुम्ही हे सगळं थांबवा नाहीतर आताच्या आता पोलिसात देऊ शकतो आम्ही तुम्हाला.’ हे ऐकून शालिनीला धक्का बसतो. हेही वाचा - S hailesh Lodha : तुम्ही शेवटचे खरं कधी बोलला होतात?’; शैलेश लोढा यांनी थेट साधला असित मोदींवर निशाणा मालिकेत आतापर्यंत शालिनीने खूप कारस्थानं केली आहेत. गौरीला त्रास देण्यासाठी ती सर्वोतपरी प्रयत्न करत असते. पण आता मात्र तिला तिच्या सगळ्या कर्मांची शिक्षा लवकरच मिळणार असं दिसतंय. गौरी आणि जयदीपने उचलेल्या या पावलाला किती यश मिळतं ते मालिकेच्या आगामी भागांमध्ये समजेल. त्यामुळे मालिकेचे येणारे भाग पाहणं रंजक ठरणार आहे. आता शालिनी सगळ्यांसमोर तिच्या पापांची कबुली देणार का, जयदीप आणि गौरी शालिनीला खरंच शिक्षा देणार कि सुधारण्याची अजून एक संधी देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. सुख म्हणजे काय असतं मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे मालिका टीआरपी मध्ये पाच मध्ये आहे. या मालिकेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. आता येणाऱ्या काळात मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.