मुंबई 27 जून: (Sony Marathi) सोनी मराठीवरील ‘सुंदर आमचं घर’ (Sundar Aamcha Ghar) ही एक अनोखी मालिका सध्या सगळ्या प्रेक्षकांच्या पसंतीस मिळत आहे. सासू सुनेच्या गोड नात्याची ही गोष्ट असून स्त्रीचं कुटुंबाबतील असलेलं स्थान तिला मिळवून देण्यासाठी सध्या काव्या झटताना दिसत आहे. या मालिकेच्या नव्या भागात पुरुषप्रधान संस्कृतीला धक्का लावत पुरुषांना चांगला इंगा दाखवायचं काम काव्या हाती घेणार आहे असं दिसत आहे. समाजात स्त्रीला समानतेची वागणूक मिळावी म्हणून आजपर्यंत अनेक चळवळी करण्यात आल्या. स्त्रीला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. तरीही आजही काही भागात स्त्रियांना कमी लेखलं जातं आणि असंच काहीसं दृश्य या मालिकेतील कुटुंबात आहे. पण मालिकेतील हिरोईन काव्या मात्र ही परिस्थिती बदलून राहणार असा निश्चय करूनच घरात नवी सून म्हणून आली आहे. तिला यात तिची सासू कशी मदत करते आणि ती सासूला सबळ करण्यात कशी यशस्वी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून त्यात पुरुषमंडळी स्वयंपाकघरात काम करताना दिसत आहेत. मालिकेत घरातली पुरुषमंडळी जी एरवी घरातल्या स्त्रियांवर हुकूम गाजवताना दिसतात ती आता कंबर कसून स्वयंपाक करताना दिसत आहेत. आणि त्यांची अक्षरशः तारांबळ उडताना दिसत आहे. या मालिकेत स्त्रियांना कायम स्वयंपाक आणि घरची काम करताना प्रेक्षकांनी पाहिलं आहे, त्यांना घरात समान वागणूक मिळत नाही पण आज कोणत्यातरी माणसाशी डील क्रॅक करायच्या नादात राजपाटलांचे सगळे पुरुष चक्क स्वयंपाक करताना दिसत आहेत. आणि त्यांना काहीच नीट जमत नसल्याने त्यांची बोलती बंद झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे.
काव्या आता पुढे जाऊन घरातल्या पुरुषांचा अहंकार कसा संपवते आणि राजपाटील कुटुंबाला समानतेचा धडा कसा शिकवते हेच पाहणं गंमतशीर ठरणार आहे. हे ही वाचा- लेकीच्या वाढदिवसाला सिद्धार्थ तृप्ती एकत्र! दोन वर्षांनी शेअर केलाय बायकोबरोबरचा PHOTO या मालिकेत काव्या सध्या छोट्या छोट्या गोष्टीतून घरात रूळायचा प्रयत्न तर करत आहे पण काही ठिकाणी मात्र जिथे स्त्रियांना समान स्थान नाही अशा बाबतीत ती ठामपणे मत मांडताना दिसते. या मालिकेचा विषय आणि त्याची गोड मांडणी याने ही मालिका सध्या पसंत केली जात आहे. या मालिकेत संचिता कुलकर्णी, संचित चौधरी,सुकन्या मोने, उषा नाडकर्णी अशी तगडी स्टारकास्ट आहे.