Home /News /entertainment /

तारक मेहतामध्ये All Is Not Well? अंजली भाभी ऑफस्क्रीन कोणाशी बोलत नाही

तारक मेहतामध्ये All Is Not Well? अंजली भाभी ऑफस्क्रीन कोणाशी बोलत नाही

तारक मेहतामधील महिला कलाकार एकमेकांशी बोलणं टाळतात; सुनैना फौजदारनं सांगितलं कारण

    मुंबई 19 जुलै: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. जवळपास गेली 13 वर्ष ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यावरूनच मालिकेच्या लोकप्रियतेचा अंदाज आपल्याला येतो. तारक मेहतानं मिळवलेल्या यशात त्यामधील कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे. कुठलाही साधा प्रसंग देखील हे कलाकार अगदी उत्तम प्रकारे प्रेक्षकांसमोर सादर करतात त्यामुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम नेहमीच हवाहवासा वाटतो. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल रुपेरी पडद्यावर एकमेकांचे जिवश्च कंठश्च मित्र-मैत्रीणी असलेले हे कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांसोबत फारसे बोलत नाही. विशेषत: महिला कलाकार. अन् याचे कारण मालिकेतील अंजली भाभी (Anjali Bhabhi) उर्फ अभिनेत्री सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) हिने सांगितले. 'तारक मेहता..'ने दिली नवी ओळख; असा आहे सुनैना फौजदारचा अभिनयप्रवास सुनैना फौजदार ही तारक मेहतामध्ये अंजली तारक मेहता ही व्यक्तिरेखा साकारते. तिने अलिकडेच अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने मालिकेतील महिला कलाकार एकमेकांशी फारशा का बोलत नाही? याचं कारणही सांगितलं. ती म्हणाली, “मालिकेत काम करणं हे दिसतं तितकं सोपं नाही. तुम्ही जसे एखाद्या कंपनीत काम करता तसाच हा प्रकार आहे. तुम्ही सकाळी कामावर जाता आणि रात्री घरी येता. आम्ही देखील दिवस-रात्र काम करत असतो. त्यामुळे स्क्रीप्ट हातात मिळताच आम्ही आपापले डायलॉग्स पाठांतर करायला लागतो. त्यामुळे रिकाम्या वेळेत सर्वच कलाकार आपल्या भूमिकेचा अभ्यास करत असतात. त्यामुळे कामाव्यतिरिक्त फारसं बोलणं होत नाही.” ‘…त्यावेळी उपचारासाठी नव्हते पैसे’; नाना पाटेकर वडिलांच्या आठवणीनं झाले भावुक “माझं पाठांतर थोडं कच्च आहे. त्यामुळे डायलॉग लक्षात राहात नाही. परिणामी मला ते डायलॉग्स माझ्यापरीने फुलवावे लागतात. यासाठी कामावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे मी देखील ऑफस्क्रीन इतरांशी फारसं बोलताना दिसत नाही. पण याचा अर्थ आमच्यात मतभेद आहेत. किंवा आमचं एकमेकांसोबत पटत नाही असं अजिबात नाही. या केवळ अफवा आहेत. आम्ही इतके वर्ष एकमेकांसोबत काम करतोय. मालिका सातत्याने लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अन् याचं एकमेव कारण म्हणजे आमच्यातील समन्वय. त्यामुळे प्रेक्षकांची चिंता करू नये आमच्यात खूप चांगले संबंध आहेत. अन् असेच आम्ही तुमचे मनोरंजन करत राहू.”
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma, Tv actress

    पुढील बातम्या