मुंबई 18 जुलै: नाना पाटेकर (Nana Patekar) हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास गेली चार दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. (Nana Patekar Movie) आज नाना पाटेकर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. परंतु एक काळ असाही होता जेव्हा वडिलांच्या औषधासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. अलिकडेच नानांनी ‘कौन होणार करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये हजेरी लावली. यामध्ये जुने अनुभव शेअर करताना नाना भावुक झाले.
शोचे होस्ट अभिनेते सचिन खेडेकर यांनी नाना पाटेकर यांना त्यांच्या वडिलांविषयी विचारले होते. उत्तर देत नाना पाटेकर भावुक झाल्याचे पाहायला मिळते. ते म्हणाले, “माझ्या वडिलांना नाटक आणि सिनेमाचं फार अप्रूप होतं. तमाशाला बापाने मुलाला घेऊन जायचं हे किती विचित्र वाटेल. पण नाही. तू येऊन पाहा. त्या कलाकारांचा अभिनय पाहा असे ते म्हणायचे. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये माझी सांपत्तीक स्थिती नीट नव्हती. ज्यावेळी ते आजारी होते तेव्हा. दुर्दैवाने आपल्या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ते गेले. औषधालाही पैसे नव्हते आमच्याकडे फारसे. मंगेश आणि मी शेवटी केईएम हॉस्पिटलच्या इथे बाहेर एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो. तेव्हा वडील आतमध्ये जनरल वॉर्डमध्ये होते” अशी आठवण नानांनी सांगितली.
राखी सावंतची अनोखी भेट; दिशा-राहुलला दिलं हे लाखोंचं गिफ्ट
View this post on Instagram
Minissha Lamba दुसऱ्यादा पडली प्रेमात; पतीला घटस्फोट दिल्यानंतर बिझनेसमॅनला करतेय डेट
नाना पाटेकर यांनी 4 दशकं बॉलिवूडवर राज्य गाजवलं आहे. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची देशातच नाही तर जगभरातही ओळख आहे. नाना पाटेकर जसे उत्तम अभिनेते आहेत तसेच ते चांगले कूक आहेत. पाककलेमध्ये त्यांना विशेष आवड आहे. ते अजूनही त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी स्वत: जेवण बनवतात. अतिशय यशस्वी अभिनेता असूननी नाना पाटेकर साधं सरळ आयुष्य जगतात. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी पाटेकरांनी आणि मकरंद अनासपुरे यांनी मिळून नाम ही संस्था सुरू केली आहे. आजपर्यंत अनेकांना या संस्थेद्वारे मदत मिळाली आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाना पाटेकरांनी गमन नावाच्या एका सिनेमातून एका छोट्याच्या भूमिकेतून करिअरची सुरूवात केली होती.त्यांना खरी ओळखी एन चंद्रा यांच्या अंकुश आणि विधू विनोद चोप्रा यांच्या परिंदा सिनेमामुळे मिळाली होती. 1991 मध्ये प्रदर्शित झालेला क्रांतीवीर हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी 'यशवंत', 'वजूद', 'युगपुरुष', 'गुलाम-ए-मुस्तफा' सारख्या अनेक भूमिकांमध्ये हिरोची भूमिका साकारली. 'खामोशी', 'यशवंत', 'अब तक छप्पन', 'अपहरण', 'वेलकम' आणि 'राजनीति' या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nana patekar, Sachin khedekar, Tv actor