मुंबई, 03 डिसेंबर : मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवन नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर विविध विषयावर त्याचे मत बिनधास्त मांडत असतो. नुकताच सुमित राघवन यांनी आरे कारशेडवरुन वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या मुद्दयाला हात घातला आहे. सुमीत राघवनने गोरेगाव येथील आरे कारशेड मेट्रो 3 प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. याबाबत वेळोवेळी ट्विट करत त्यांनी त्यांचं मतही व्यक्त केलेलं आहे. नुकतेच त्याने पुन्हा या संदर्भात एका ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने आरे कारशेड विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची खिल्ली उडवली आहे. आता हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
सुमीत राघवनने दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट रिट्वीट केले होते. त्यात त्याने एक व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. या व्हिडिओला 'फ्रेंचचे काही नागरिक क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना' असे कॅप्शन दिले होते. सुमीतने या व्हिडिओ रिट्वीट करत असे काही लिहिले आहे की, त्यावरून नवा वाद निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा - Marathi Serials: अनुष्काच्या एन्ट्रीने प्रेक्षक नाराज; टीआरपी शर्यतीत 'आई कुठे काय करते' पडली मागे
आरेच्या आंदोलकांसोबत आपणही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले होते, बोगस फालतू लोक. कामाचे ना कामाचे, ना धामाचे. असं म्हणत सुमीतनं आरे आंदोलकांची खिल्ली उडवली आहे. सुमीतच्या या ट्विटमुळं नव्या वादाला तोडं फुटण्याची शक्यता आहे. पण ही काही पहिली वेळ नाही , की त्यानं आरे आंदोलकांवर निशाणा साधला आहे.
Aarey activists ke saath yahi karna chahiye tha hum logon ne.. Sar pe chadh ke baith gaye they ye bogus faltu log.. Kaam ke na kaaj ke...zholachaap... https://t.co/acXrPiDQw3
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) December 1, 2022
सुमीतच्या या ट्विटनंतर काही नेटकऱ्यानी विशेषत: आरे आणि पर्यावरणप्रेमींनी टीका केली आहे. आम्हालाही मेट्रो हवी आहे, पण मुंबईत इतक्या मोकळ्या जागा असताना आरेतील पर्यावरण नष्ट करण्याचा सरकारनं घातलेला घाट चुकीचा आहे, असं म्हणत सुमीतला काहींनी खडे बोल सुनावले आहेत. तसाच एका नेटकऱ्यानी ''रंगमंचावर आणि पडद्यावर काम करण्यासाठी डोक्याचा काही वापर नसतो, तुम्हाला सगळे दुसऱ्याने दिलेलेच बोलायचे असते. त्यात स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी असतो. '' अशी खोचक टीका देखील केली आहे.
#SumeetRaghavan रंगमंचावर आणि पडद्यावर काम करण्यासाठी डोक्याचा काही वापर नसतो, तुम्हाला सगळे दुसऱ्याने दिलेलेच बोलायचे असते. त्यात स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी असतो. (काही अपवाद जरूर आहेत)https://t.co/mRzj761dOs pic.twitter.com/zFNv5tWt6A
— Sachin Chavan (@SACHINKCHAVAN) December 2, 2022
काही महिन्यांपूर्वी देखील सुमीतनं असंच ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यानं म्हटलं होतं की, ''एक वेगळाच आवाज ऐका. मी स्वत: नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे. आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला मुंबई मेट्रोचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवं आहे. राहिला मुद्दा कारशेडचा,तर #कारशेड वहीं बनेगा.. म्हणजे कुठे? तर आरे मध्येच.''
आता पुन्हा एकदा सुमितनं याच मुद्द्यावर मत मांडलं आहे. पण आता या ट्विट मुले नव्या वादाला तोंड फुटलं असून सुमित आणि नेटकऱ्यांमध्ये ट्विट वॉर चांगलंच रंगलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.