Marathi Serials: अनुष्काच्या एन्ट्रीने प्रेक्षक नाराज; टीआरपी शर्यतीत 'आई कुठे काय करते' पडली मागे
टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या मालिकांपैकी कोणती मालिका प्रेक्षकांना सर्वाधिक आवडते हे सांगणारा टीआरपी चार्ट समोर आला आहे. तुमची आवडती मालिका कितव्या क्रमांकावर आहेत पाहा.
दीपा आणि कार्तिकच पुन्हा जुळत असलेलं नातं प्रेक्षकांना आवडत असून रंग माझा वेगळा मालिका या आठवड्यात नंबर वन वर आहे. 'रंग माझा वेगळा' ही मालिका गेले अनेक दिवस टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.
2/ 9
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
3/ 9
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी 6.2 टीआरपी रेटिंगसह ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
4/ 9
'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.
5/ 9
एकेकाळी टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात सध्या कमी पडली आहे. या आठवड्यात मालिकेत अनुष्काची झालेली एंट्री प्रेक्षकांना पसंत पडलेली दिसत नाही. मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.
6/ 9
'आता होऊ दे धिंगाणा' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमाला 5.5 रेटिंग मिळाले आहे.
7/ 9
'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.
8/ 9
टीआरपीच्या शर्यतीत 'स्वाभिमान' ही मालिका आठव्या स्थानावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
9/ 9
'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.3 रेटिंग मिळाले आहे.