मुंबई, 05 जून: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी काल जगाचा निरोप घेतला. वयाच्या 94 वर्षी सुलोचना दीदी काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दीदींच्या जाण्याने मनोरांजण विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहे. अशातच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी सुलोचना दीदींसाठी एक भावुक पोस्ट केली आहे. सुलोचना दीदी आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केलं आहे. आता सुलोचना दीदींच्या जाण्याने धर्मेंद्र भावुक झालेले पाहायला मिळाले. निरुपा रॉय व्यतिरिक्त अमिताभ बच्चन ते धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांच्या आईची भूमिका करणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे सुलोचना लाटकर. पण आता सुलोचना लाटकर यांनी या जगाचा निरोप घेतला. सुलोचना लाटकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमिताभ बच्चन आणि आशा पारेख यांच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सुलोचना लाटकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. आता सुलोचना यांच्या निधनांनंतर धर्मेंद्र यांची पोस्ट चर्चेत अली आहे.
धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. त्यांनी अभिनेत्रीसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो एका चित्रपटातील आहे, ज्यात सुलोचना लाटकर यांनी धर्मेंद्रच्या आईची भूमिका केली होती. फोटो शेअर करून धर्मेंद्र यांनी लिहिले आहे की, ‘तुमची खूप आठवण येईल. कितीतरी चित्रपटात तुम्ही माझी आई होतात.’ धर्मेंद्र यांनी रात्री 3.36 च्या सुमारास हे ट्विट केले आहे. त्यामुळे सुलोचना लाटकर यांच्या निधनाने धर्मेंद्र खूपच अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. धर्मेंद्र यांनी आणखी एक ट्विट केले आहे. Actress Sulochana : चौथ्या वर्षी अभिनय विश्वात पदार्पण तर 14 व्या वर्षीच बांधली लग्नगाठ; कसं होतं सुलोचना दिदींचं आयुष्य? धर्मेंद्रचे हे ट्विट वाचून चाहतेही सध्या काळजीत आहेत आणि ते अभिनेत्याला धीर देत आहेत. आतापर्यंत धर्मेंद्रने आपले अनेक प्रिय मित्र गमावले आहेत. धर्मेंद्र अनेकदा सोशल मीडियावर भावुक पोस्ट करताना पाहायला मिळतात. धर्मेंद्रने आणखी एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने आपला फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘सारे जहाँ का दर्द, हमारे जिगर में है’. सुलोचना लाटकर यांच्याविषयी बोलायचं तर, हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी चित्रपटातही भरपूर काम केले आहे. सुलोचना लाटकर यांनी जवळपास 250 हिंदी आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुनील दत्त, देव आनंद आणि राजेश खन्ना तसेच धर्मेंद्र, अमिताभ बच्चन या दिग्गज अभिनेत्यांच्या आईची भूमिका भूमिका सुलोचना लाटकर यांनी गाजवली होती. नुकतीच सुलोचना लाटकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुलोचना यांना काही दिवसांपासून श्वसनाचा आजार होता, असे सांगण्यात येत आहे. याशिवाय वाढत्या वयाच्या समस्यांमुळे ती त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे.