• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • सुलेमान मर्चंट यांचा मोठा खुलासा, मृत्यूच्या एक दिवस आधी काय घडलं मंदिरा-राज यांच्या घरात?

सुलेमान मर्चंट यांचा मोठा खुलासा, मृत्यूच्या एक दिवस आधी काय घडलं मंदिरा-राज यांच्या घरात?

अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचं बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. राज यांच्या निधनामुळे केवळ त्यांचे कुटुंबीयच नाहीत तर मनोरंजनविश्वच दु:खात आहे.

  • Share this:
मुंबई, 02 जुलै: अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती आणि दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचं बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. राज यांच्या निधनामुळे केवळ त्यांचे कुटुंबीयच नाहीत तर मनोरंजनविश्वच दु:खात आहे. राज यांच्या अंत्यसंस्कारावेळी चित्रपट आणि टीव्हीच्या दुनियेतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. मंदिराने साश्रू नयनांनी अंत्य संस्कार पार पाडले. आता राज यांचा मित्र आणि संगीतकार सुलेमान मर्चंट (Suleiman Merchant) यांनी आता एक खुलासा केला आहे. ते म्हणाले, 'मंगळवारी संध्याकाळीच राज यांना छातीत दुखत होतं त्यांनी मंदिराला सांगितलं होतं की मला छातीत दुखतंय पण त्यांना मंदिरा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तोपर्यंत फार उशीर झाला होता.' ई टाइम्सशी बोलताना सुलेमान यांनी ही माहिती दिली. 30 व्या वर्षी आला होता पहिला हार्ट अटॅक  राज यांना मंगळवारी संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत असल्याची माहिती सुलेमान यांनी दिली. ते म्हणाले की, 'छातीत दुखतंय म्हणून त्यांनी अँटॅसिड टॅब्लेट (Antacid Tablet) घेतली. बुधवारी पहाट 4 वाजता राजनी मंदिराला सांगितलं की त्याला हार्ट अटॅक येतो आहे. मंदिराने तातडीने त्यांचा मित्र आशीष चौधरीला फोन केला आणि ते दोघं राजला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला लागले पण राजची शुद्ध हरपली होती. त्यांनी राजला हॉस्पिटलमध्ये नेलं पण 5-10 मिनिटांत त्यांच्या लक्षात आलं की राजची नाडी चालू नव्हती. डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता. या आधीही राज 30-32 वर्षांचे असताना त्याला हार्ट अटॅक आला होता पण त्यानंतर त्यानी स्वत: ची खूप काळजी घ्यायला सुरुवात केली होती. आता त्याची तब्येत खूप सुधारली होती.' हे वाचा-मंदिरा बेदीने पतीच्या निधनाआधी 'ती' पोस्ट का केली होती?नेटिझन्सनी विचारले प्रश्न सुलेमान आणि राज हे खूप चांगले मित्र होते. मनोरंजन विश्वात संघर्षाच्या काळापासून ते परस्परांचे मित्र होते. जवळजवळ 25 वर्षं ते सोबत होते. इतका जुना जिवलग मित्र गमावल्याने सुलेमान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. राज मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम करत असल्यापासून त्यांची ओळख होती. सुलेमान पुढे म्हणाले की, 'या महामारीच्या काळात काही महिन्यांपूर्वी मी राजच्या घरी गेलो होतो. राजचा पहिला चित्रपट प्यार में कभी-कभीला संगीत मी आणि सलीमनी दिलं होतं. मी त्याच्या कायम संपर्कात होतो. आम्ही जेव्हा भूमी 2020 या अब्लमचं काम सुरू केलं तेव्हा त्यानी शूटिंगसाठी भाड्याने घेणार असलेल्या बंगल्यात राहण्याची ऑफर आम्हाला दिली होती पण आम्हाला तिथं शूटिंग करता आलं नाही.’ हे वाचा-बॉलिवूडनं मंदिरा बेदीला दिला मानसिक आधार; या सेलिब्रिटींनी घरी जाऊन घेतली भेट मंदिरा आणि राज यांनी 1999 साली विवाह केला होता. 2011 साली त्यांनी एका मुलाला जन्म दिला तर मागील वर्षी त्यांनी एक 4 वर्षांची मुलगी दत्तक घेतली होती. राज यांनीही  दोनच दिवसांपर्वी सोशल मीडिया वर एक पोस्ट केली होती ज्यात ते पार्टी करताना आनंदी दिसत आहेत तर त्यात मंदिरा आणि त्यांचे काही मित्र ही सामील दिसत आहेत. राज यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील करिअरला 1989 ला लेखक म्हणून सुरुवात केली होती. ते मुकुल आनंद यांचे असिस्टंट होते. त्यांनी नंतर स्वत: ची अडव्हर्टायझिंग आणि प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आणि 800 जाहिराती डायरेक्ट केल्या. सध्याचा आघाडीचा अभिनेत विकी कौशल याच्यासोबत त्यांनी शेवटची जाहिरात शूट केली होती. त्याचबरोबर राज यांनी प्यार में कभी-कभी आणि शादी का लड्डू या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.
First published: