मुंबई, 1 नोव्हेंबर : ‘दो रुपये भी बहोत बडी चीझ होती है बाबू’ हा डायलॉग आठवतोय का. हा डायलॉग आहे ईशा म्हणजेच गायत्री दातारचा. मालिकाविश्वात अल्पावधीतच आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. गायत्रीने झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने सुबोध भावे सोबत मुख्य भूमिका साकारली होती. तिची ‘ईशा’ ही भूमिका विशेष गाजली होती. अजूनही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर तिने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात सुद्धा विनोदी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्ये झळकली होती. आता पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक साठी ती सज्ज झाली आहे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिकेत गायत्री महत्वाची भूमिका साकारणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिका सध्या एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. जयदीप आणि गौरी एकमेकांपासून सध्या कायमचे दुरावले आहेत. एकीकडे घरच्यांसाठी बाळ आणि जयदीप कायमचे गेले आहेत. तर दुसरीकडे जयदीपने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. मालिकेने त्यामुळे ६ वर्षांचा लीप घेतला आहे. लीपनंतर कथानकात बरेच बदल झाले आहेत. जयदीप गौरी एकमेकांपासून दुरावले असून या दोघांची लाडकी लेक म्हणजेच लक्ष्मी जयदीपसोबत वेगळ्या शहरात रहात आहे. जयदीप गौरीची पुन्हा भेट होणार का याची उत्सुकता नक्कीच आहे. मात्र मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. हेही वाचा - वादळवाट ते सनी! तब्बल 18 वर्ष एकत्र काम करतेय ही जोडी, लवकरच येतोय नवा सिनेमा रुही कारखानीस असं नव्या पात्राचं नाव असून अभिनेत्री गायत्री दातार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही नवी भूमिका साकारण्यासाठी गायत्री खुपच उत्सुक आहे. खूप मोठ्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. याविषयी बोलताना गायत्री म्हणाली कि,‘‘स्टार प्रवाहसोबतची माझी ही पहिलीच मालिका आहे. मालिकेतली माझी भूमिका आणि लूक खूपच वेगळा आहे.’’ तसेच ती पुढे म्हणाली कि, ‘‘सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूसोबत मी एक रिऍलिटी शो केला होता. त्यामुळे गिरीजासोबत जुनी मैत्री आहे. त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतंच्या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होत आहे’’ अशी भावना गायत्रीने व्यक्त केली.
अजूनही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर तिने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात सुद्धा विनोदी भूमिका साकारली होती. आता पुन्हा मालिकाविश्वात कमबॅक साठी ती सज्ज झाली आहे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिकेत गायत्री महत्वाची भूमिका साकारणार आहे. रुही कारखानीसच्या येण्याने मालिकेत नेमकं काय वळण येणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. सुख म्हणजे काय असतं मालिकेत चालू असलेल्या या ट्रॅक मुळे मालिका टीआरपी मध्ये पाच मध्ये आहे. या मालिकेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. असं असलं तरी मागच्या आठवड्यात सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका पहिल्या क्रमांकावरून थेट पाचव्या क्रमांकावर आली होती. मालिकेत सध्या गौरीला बाळ झालं आहे. गौरीच्या अपघातानंतर मालिका पहिल्या क्रमांकावर आली होती. या आठवड्यात मालिकेने पुन्हा टीआरपी वाढवत पाच वरून तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. या आठवड्यात मालिका 6.5TVT रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.