मुंबई, 22 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका या आठवड्यात टॉप 2मध्ये आहे. मालिकेला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. पण जस जस मालिकेचं कथानक पुढे सरकतय तशी मालिका फारच रेंगाळत जाताना दिसतेय. सध्याच्या ट्रॅकमध्ये गौरी प्रेग्नंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. नवव्या महिन्यात गौरीचा अपघात होणार आहे. प्रेक्षकांना मात्र हे काही पटलेलं नाही. मालिकेत सतत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स पाहून प्रेक्षक चांगलेच वैतागले आहेत. सोशल मीडियावर मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिकेला चांगलंच धारेवर धरलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत कोणताही ट्विस्ट आला की तो गौरीच्या जिवाशी संबंधीत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात गौरी प्रेग्नंट आहे आणि नवव्या महिन्यात गौरीचा रस्त्यात अपघात होतो. रस्त्याच्या मधोमध उभी राहून गौरी जयदीपचा फोटो काढत असते. तितक्यात मोठा ट्रॅक समोरून येतो आणि गौरीला धडक देतो. प्रेग्नंट गौरी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळते. जयदीप तिला हॉस्पिटलला नेतो पण डॉक्टर आम्ही गौरी किंवा बाळ यातील एकालाच वाचवू शकतो असं सांगून मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात.
हेही वाचा - Marathi Serial TRP : दीपा, अरुंधतीला चिमुकल्या स्वराचा छोबीपछाड; ‘तुझेच मी गीत गात आहे’ ठरली नंबर 1 मालिका मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या मात्र चांगलाच डोक्यात गेला आहे. दरवेळी गौरीलाच कसं काही होत असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मालिकेच्या आधीच्या भागातही गौरीचं डोहाळे जेवण असतं पण शालिनी कटकारस्थान करून झोपाळ्याची कडी काढून गौरीचा अपघात करते. त्यातूनही गौरी सुखरूप बचावते. इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी मालिकेत गौरी मेल्याचं दाखवण्यात आलं होतं पण कथानक फिरवून तिला परत आणलं. ते सगळं नाट्यही प्रेक्षकांच्या चांगलंच डोक्यात गेलं होतं.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा प्रोमो पाहून एका युझरनं म्हटलंय, ‘अरे नुसते तिच्याबरोबर काय ना काय तरी अपघात दाखवतात. फालतुगिरी. एकदाची तिला मारुन टाका आणि मालिका संपवून टाका. कंटाळा आला तेच तेच बघून’.
तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘बिचारीच्या आयुष्यात सुखच नाही कोणी तरी सांगा तिला सुख म्हणजे नक्की काय आहे ते’.