Home /News /entertainment /

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे निधन

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे निधन

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीची अम्मा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आशा ज्ञाते यांच्या आईचे निधन झाले आहे.

  मुंबई, 9 फेब्रुवारी- सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरीची अम्मा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा ज्ञाते  (Asha Dnyate ) यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आशा ज्ञाते यांच्या आईचे निधन झाले आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. सोशल मीडियावरून त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आशा ज्ञाते यांनी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे कि, अखेरचा श्वास घेऊन....निरोप घेतला आईने.....94 वर्षे....8/2/2022.आज पोरकी झाले..... 😭😭😭😭आई नाही तर काहीच नाही.....घे जन्म तू फिरोनी, येईन मी ही पोटी खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी.... 🙏🙏❤️🙏🙏😭आsssssssई.....आशा दाते यांच्या आईच्या निधनानंतर मालिकेतील कलाकारांनी तसेच चाहत्यांनी देखील दुख व्यक्त केले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Aasha Dnyate (@aashagopal_)

  'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत अम्मा ही भूमिकेमुळे अशा ज्ञाते घराघरांत पोहोचल्या आहेत. त्यांची भूमिका घरकाम करणाऱ्या महिलेची आहे. कर्नाटकी भाषेत बोलणारी अम्मा प्रेक्षकांना जवळची वाटते. गौरी या मुख्य पत्राबरोबरचं असलेलं अम्माचं नातं प्रेक्षकांना मायलेकीचं नातं वाटतं. शाळा, कॉलेज असताना त्यांनी कधीच रंगभूमीवर काम केलं नव्हतं. परंतु कामगार कल्याण केंद्रातून त्यांच्या अभिनयप्रवासाला सुरुवात झाली. नाटक-एकांकिकांचं दिग्दर्शन त्या करू लागल्या आणि अभिनय क्षेत्रात उतरल्या. वाचा-अन् आई अमृता सिंह चालवते पॉर्न साइट' सारा अली खान असं का म्हणाली होती? अशा ज्ञाते यांनी 1999 साली अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर 2000 साली 'हे रामा आत्मारामा' या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांच्या त्या भूमिकेचं आणि नाटकाचंही खूप कौतुक झालं. त्यानंतर 'नारी झाल्या भारी', 'आमचं सगळं सातमाजली' अशी अनेक नाटकं त्यांनी केली आणि रंगभूमीवर त्या स्थिरावल्या.'आजपर्यंत इतक्या भूमिका केल्या परंतु अम्मानं मला खरी ओळख दिली. वाचा-दलित महिलांवरील भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्कर नामांकन, इथे वाचा सर्व नॉमिनेशन्स आशा ज्ञाते यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. रेश्मा आणि रिमा या त्यांच्या मुली आहेत यातील रिमा ज्ञाते यांचा नुकताच विवाह पार पडला होता. तर रेश्मा ज्ञाते ही अभिनेत्री तर आहेच शिवाय रेडिओ जॉकी म्हणूनही तीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Death, Entertainment, Heartbreaking, Marathi entertainment, Mother, Shocking news, Tv actress, Tv serial

  पुढील बातम्या