मुंबई, 09 फेब्रुवारी: 94 व्या अकादमी पुरस्कारांच्या (
Academy Awards 2022) नॉमिनेशन्सची घोषणा मंगळवारी
(8 फेब्रुवारी) संध्याकाळी करण्यात आली. या अंतर्गत 23 विभागांमध्ये अनेक चित्रपट नॉमिनेट करण्यात आले आहेत. या नॉमिनेशन्सची घोषणा अभिनेत्री ट्रेसी एलिस रॉस आणि अभिनेता-कॉमेडियन लेस्ली जॉर्डनने केली. अनेक चित्रपटांची घोषणा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या फिल्म आर्टचे विद्यार्थी आणि काही चित्रपटांची अमेरिकन फायर फायटर्सच्या एका टीमने केली.
डॉक्युमेंट्री फीचर विभागात भारतीय डॉक्युमेंट्री ‘रायटिंग विथ फायर’ (
Writing With The Fire) ने 94 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकन यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. याची घोषणा ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डनने मंगळवारी संध्याकाळी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स आणि सायन्सेसच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून केली. रिंटू थॉमस आणि सुष्मित घोषने या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन केलं आहे. ‘रायटिंग विथ फायर क्रॉनिकल्स द राईज ऑफ खबर लहरिया’ भारताचं एकमेव बातमी पत्र आहे, जे दलित महिला चालवतात. त्यांची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे.
हे वाचा-VIDEO: देवदूत Sonu Sood, अपघातातल्या जखमी तरुणाला स्वतः उचलून नेलं रुग्णालयात
याशिवाय बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘द पॉवर ऑफ द डॉग’ (
The Power Of Dog) ला 12 विभागांत नॉमिनेट करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेन कँपियन यांनी बेस्ट डायरेक्टरच्या विभागात अनेकदा नॉमिनेट होऊन इतिहास रचला आहे. एकापेक्षा जास्तवेळा दिग्दर्शक म्हणून नॉमिनेट होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांचा मागचा चित्रपट ‘द पियानो’ हाही नॉमिनेट झाला होता.
वेस्ट साईड स्टोरीच्या निर्मात्यांच्या नावे रेकॉर्ड
दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्गनेही एक नवा रेकॉर्ड बनवला. ‘वेस्ट साईड स्टोरी’
(West Side Story) च्या निर्मात्यांना एकूण 7 विभागांत नॉमिनेशन मिळालं आहे. स्पिलबर्गच्या 11 चित्रपटांची आत्तापर्यंत बेस्ट चित्रपटाच्या विभागात निवड झाली असून ऑस्करसाठी हे नवं रेकॉर्ड आहे.
हे वाचा-बॉलिवूड ते छोटा पडदा 'हे' कलाकार साजरा करणार लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे'
94 वा अकादमी पुरस्कार
(Oscar Awards Nomination Full List) सोहळा रविवारी, 27 मार्चला होणार आहे. खालील यादीत तुम्हाला कोणता चित्रपट कोणत्या विभागात सामील करण्यात आला आहे हे पाहता येईल.
बेस्ट चित्रपटासाठी नॉमिनेट झालेले चित्रपट आहेत
बेलफास्ट, कोडा, डोंट लुक अप, ड्राईव्ह माय कार, ड्यून, किंग रिचर्ड, लिकोराईस पिझ्झा, नाईटमेयर अॅली, द पॉवर ऑफ द डॉग, वेस्ट साईड स्टोरी.
सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी नॉमिनेट झालेल्या अभिनेत्री
जेसी बॅकले - द लॉस्ट डॉटर, अरियाना देबोस - वेस्ट साईड स्टोरी, ज्यूडी डेंच - बेलफास्ट, कर्स्टन डंस्ट - द पॉवर ऑफ द डॉग, अँजन्यू अॅलिस - किंग रिचर्ड.
सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी नॉमिनेट झालेले अभिनेते
सियारन हिंडस - बेलफास्ट, ट्रॉय कोत्सुर - कोडा, जेसी पेलेमन्स - द पॉवर ऑफ द डॉग, जे.के. सिमन्स - बीईंग द रिकार्डोस, कोडी स्मिट-मॅक्फी - द पॉवर ऑफ द डॉग.
आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म विभागासाठी नॉमिनेट झालेले चित्रपट
ड्राईव्ह माय कार, फ्ली, द हँड ऑफ गॉड, लुनाना: अ याक इन द क्लासरूम, व्हर्स्ट पर्सन इन द क्लासरूम
डॉक्युमेंट्री (शॉर्ट) विभागासाठीची नॉमिनेशन्स
ऑडीबल, लीड मी होम, द क्वीन ऑफ बास्केटबॉल, थ्री साँग फोर बेनझीर, व्हेन वी आर बुलीज
हे वाचा-'Writing with Fire' या भारतीय डॉक्युमेंट्रीला ऑस्करसाठी नामांकन !
डॉक्युमेंट्री फीचर विभागासाठीची नॉमिनेशन्स
एसेन्सन, अॅटिका, फ्ली, समर ऑफ सॉल, रायटिंग विथ फायर
मुख्य भूमिकेतील अभिनेत्यांसाठीची नॉमिनेशन्स
झेव्हियर बर्डेम - बीईंग द रिकार्डोस, बेनेडिक्ट कंबरबॅच - द पॉवर ऑफ द डॉग, अँड्रयू गार्फील्ड - टिक, टिक … बूम!, विल स्मिथ - किंग रिचर्ड, डँझल वॉशिंग्टन - द ट्रॅजेडी ऑफ मॅकबेथ
मुख्य भूमिकेतील अभिनेत्रींसाठीची नॉमिनेशन्स
जेसिका चॅस्टेन - द आईज ऑफ टॅमी फेय, ओलिव्हिया कोलमॅन - द लॉस्ट डॉटर, पेनलपे क्रूझ - पॅरलल मदर्स, निकोल किडमन - बीईंग द रिकार्डोस, क्रिस्टन स्टीव्हर्ट - स्पेन्सर.
दिग्दर्शकांच्या विभागासाठीची नॉमिनेशन्स
केनेथ ब्रानघ - बेलफास्ट, रयूसुके हमागुची - ड्राईव्ह माय कार, पॉल थॉमस अँडरसन - लिकोरिस पिझ्झा, जेन कँपियन - द पॉवर ऑफ द डॉग, स्टीव्हन स्पिलबर्ग - वेस्ट साईड स्टोरी.
डॉक्युमेंट्री फीचर विभागासाठीच्या नॉमिनेशन्समध्ये भारतीय डॉक्युमेंट्री असल्याने अकादमी पुरस्कारांबाबतची उत्सुकता भारतीयांमध्ये नक्कीच वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.