जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Jacqueline Fernandez साठी सुकेशनं श्रीलंका-बहरिनमध्ये घेतलं होतं आलिशान घर, समोर आली महत्त्वाची माहिती

Jacqueline Fernandez साठी सुकेशनं श्रीलंका-बहरिनमध्ये घेतलं होतं आलिशान घर, समोर आली महत्त्वाची माहिती

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सतत चर्चेत असते. गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणींत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरनं 200 कोटींचा केलेला गैरव्यवहार प्रकरणी जॅकलीनचं नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच या मनीलाँड्रिंग प्रकरणात तपास एजंसीनं दुसरी सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली आहे. ज्यात जॅकलिनला आरोपी करण्यात आलं आहे. कोर्टानं चार्जशीटची आठवण करून देण्यासाठी अभिनेत्रीला पुन्हा एकदा समन्स बाजावला आहे. ‘सुकेशने मुंबईतील जुहू येथे जॅकलिन फर्नांडिससाठी एक आलिशान बंगला खरेदी करण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्याने अॅडव्हान्स रक्कमही भरली होती. याशिवाय त्याने जॅकलिनच्या आई-वडिलांना बहरीनमध्ये एक आलिशान बंगला गिफ्ट केला होता’, असं इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटलं आहे. जॅकलिनची चौकशी केली असता तिने श्रीलंकेच्या घरी गेल्याची कबुली दिली, असा दावाही ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

जाहिरात

सध्या ईडी या प्रकरणाचा तपास करत असून सुकेशने काही मालमत्ता खरेदी केली होती की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच त्याने खरेदी केलेल्या मालमत्तेत गुंतवलेले पैसे गुन्हेगारी संबंधीत आहे की नाही याचाही तपास सुरु आहे. हेही वाचा -  कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेकमध्ये झाला होता वाद? कॉमेडीयनने स्वतः केला खुलासा दरम्यान, जॅकलीनचे वकिल प्रशांत पाटील यांनी म्हटलं होतं की, सुकेश चंद्रशेखर प्रकरणी माझी क्लायंट जॅकलीननं संपूर्ण सहकार्य केलं आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक चौकशीत जॅकलीननं सहभाग नोंदवला आहे. तिच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी तीनं तपास यंत्रणेला दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात