मुंबई 12 जुलै: काही सिने अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मुलांचे त्यांच्या जन्मापासूनच प्रचंड फॅन्स बनलेले असतात. काहीजण त्यांना बघण्यासाठी नेहमीच आतुरलेले असतात. सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) काळात सगळेच कलाकार आपापल्या किड्सचे फोटो, व्हिडिओज शेअर करताना दिसतात. त्यामुळे या स्टार किड्सना (Star kids) चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर फॅन्स मिळवण्यासाठी जास्तं मेहनत घ्यावी लागत नाही. अशीच एक स्टार किड इन्स्टाग्रामवर(Instagram) सतत चर्चेत असते ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan).
सुहाना खान तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सातत्याने तिचे नवीन फोटोज आणि व्हिडिओज टाकताना दिसते. आणि तिचे फॅन फॉलोइंग भरपूर असल्याने तिने टाकलेल्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्स देऊन भरभरून प्रेम व्यक्त करतात. तसंच या फोटोवर नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda), शनाया (Shanaya)आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) या तिच्या मैत्रिणीही प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अलीकडेच तिने तिची मैत्रीण मुस्कान (Muskan) सोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमधील नक्की सुहाना कोण हे ओळखणं फार कठीण वाटतंय. लाइव्ह हिंदुस्थानने (Hindustan) हे वृत्त दिलं आहे.
समांतर 2ची निर्मिती कशी केली? समीर विद्वांसने सांगितल्या दिग्दर्शनातील अडचणी
View this post on Instagram
‘काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही’; सोनाली कुलकर्णीनं सांगितला रंगभेदाचा अनुभव
या फोटोमध्ये या दोघींनी एकदम क्लोज पोज दिली असून बॅकग्राउंडला चंद्राचा (Moon background) फोटो आहे. या पोजमध्ये त्या दोघींची फक्त सावली (Shadow) दिसत आहे. त्यामुळे यातील नक्की सुहाना कोण हे आपल्याला कळणं अशक्य वाटतं. पण त्यानंतरच्या फोटोमध्ये सुहानाने तिचा सिंगल फोटो शेअर केला असून त्यात तिने हाय हिल्सचे सँडल्स घातलेले आहेत. यावरून आपण ओळखू शकतो की, हिल्स घातलेली सुहाना आहे.
सुहाना सध्या न्यू यॉर्कमध्ये(New York) तिचं उच्च शिक्षण घेत आहे. तिने लवकरात लवकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण सध्या ती फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिला पूर्ण तयारी करणे आवश्यक आहे. सुहाना न्यू यॉर्कला असताना तिचे वडील शाहरूख खान तिला खूप मिस करत होते. सुहाना खान लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल आणि तिची बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे एंट्री होईल वडिल शाहरूख खान यांच्याप्रमाणे तीदेखील बॉलीवूडवर राज्य करते की नाही, हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bold photoshoot, Shahrukh khan, Suhana khan