मुंबई 12 जुलै**:** ‘समांतर’ (Samantar 2) या वेब सीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या सीझनप्रमाणेच किंबहुना पहिल्यापेक्षा अधिक धुमाकूळ हा दुसरा सीझन घालताना दिसत आहे. गूढ कथानक आणि स्वप्नील जोशी-तेजस्वीनी पंडीतची (Swapnil Joshi Tejaswini Pandit) बोल्ड केमिस्ट्री यामुळे ही सीरिज सुपरहिट ठरली. समांतरच्या दुसऱ्या पर्वाचं दिग्दर्शन समीर विद्वांस (Sameer Vidwans) याने केलं होतं. परंतु या लोकप्रिय सीरिजचं दिग्दर्शन करणं दिसतं तितकं सोपं नव्हतं. त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. अन् हे अनुभव त्याने नेटवर्क 18 लोकमतसोबत शेअर केले. ‘समांतर-२’चे दिग्दर्शक करताना समीरसमोर अनेक आव्हानं होती. कारण आयुष्यात पहिल्यांदा तो एखाद्या सीरिजचं दिग्दर्शन करणार होता. शिवाय कोरोना आणि लॉकडाऊनशी दोन हात करत त्याला आपलं काम करावं लागत होतं. पण या सर्व आव्हानांवर मात करत त्याने कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते अर्जुन सिंग बरान व कार्तिक डी निशाणदार यांच्या सहकार्याने सीरिजची निर्मिती केली. ‘काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही’; सोनाली कुलकर्णीनं सांगितला रंगभेदाचा अनुभव या सीरिजबद्दल बोलताना समीर विद्वांस म्हणाला, “समांतर’ ही नाट्यमय मालिका असून ती गूढता व रोमांचीत करणाऱ्या दृश्यांनी पुरेपूर भरलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही मराठी सीरिज हिंदी, तेलगु आणि तमिळ या भाषांमध्ये पुढे डब करण्यात आली कारण विविध भाषिकांना याचा आनंद घेता यावा. दुसरा सिझन आम्ही मुंबई, पुणे, पाचगणी, महाबळेश्वर, भोर आणि कोल्हापूर अशा विविध ठिकाणी नैसर्गिक सौंदर्यामध्ये चित्रित केला आहे. त्यामुळे या मालिकेचा नैसर्गिक लुक कायम राहिला आहे.” क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीची किडनी फेल; ऑपरेशनसाठी चाहत्यांकडे मागतेय मदत ‘समांतर-२’ला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी समीर विद्वांसनं अर्जुन आणि कार्तिक यांचे आभार मानले आहेत. या दोघांनी या मालिकेमध्ये सर्जनशीलपणे लक्ष घातले आणि दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. “ते नवीन संकल्पनांचा खुल्या दिलाने स्वीकार करतात आणि त्या प्रत्यक्षात कशा येतील यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांनी ‘समांतर’च्या निर्मितीच्या काळात कलाकार आणि माझ्याबरोबर अगदी जवळून काम हेले आणि प्रत्येकजण सर्वोत्तम कामगिरी करेल हे पहिले,” असाही अनुभव समीरनं सांगितला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.