जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही’; सोनाली कुलकर्णीनं सांगितला रंगभेदाचा अनुभव

‘काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही’; सोनाली कुलकर्णीनं सांगितला रंगभेदाचा अनुभव

‘काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही’; सोनाली कुलकर्णीनं सांगितला रंगभेदाचा अनुभव

का बाईनं तरं काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही’ असं म्हणत तिची खिल्ली देखील उडवली होती. (Sonali Kulkarni on colourism)

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 जुलै**:** अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘गुलाबजाम’, ‘डॉ. प्रकाश आमटे’, ‘कच्चा लिंबू’, ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकणारी सोनाली गेली तीन दशकं सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Sonali Kulkarni movie) पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल करिअरच्या सुरुवातीस तिला तिच्या त्वचेच्या रंगावरून अनेकांनी सुनावलं होतं. एका बाईनं तरं काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही’ असं म्हणत तिची खिल्ली देखील उडवली होती. (Sonali Kulkarni on colourism) क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्रीची किडनी फेल; ऑपरेशनसाठी चाहत्यांकडे मागतेय मदत सोनालीने टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने तिच्यासोबत झालेल्या रंगभेदाचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी जेव्हा पुण्यात पहिल्यांदा ऑडिशनसाठी गेले होते. तेव्हा मी गिरीश कर्नाड यांना भेटले. तेव्हा तिथे आणखी एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. त्या मुलीच्या आईने मला तू इथे का आली आहेस? असा प्रश्न विचारला होता. मला त्यांचा उद्देश लक्षात आला नव्हता. त्यानंतर त्या महिला मला म्हणाल्या ‘तू आरशात तुझा चेहरा पाहिला आहेस का? काळ्य़ा मुली कॅमेरात चांगल्या दिसत नाहीत.” राजकारण नको रे बाबा! रजनीकांत यांनी पक्षच केला बरखास्त या महिलेच्या बोलण्याने सोनालीला खूप वाईट वाटलं. त्यानंतर ती गिरीश कर्नाड यांना भेटली. त्यांच्यात चांगल्या गप्पा झाल्या. सोनाली पुढे म्हणाली, “गिरिश काकांनी माझं नावं आणि माहिती विचारली. त्यांनी माझं चांगलं कौतुक केलं. त्यानंतर त्या महिलेने केलेल्या अपमान जनक वक्तव्याचं माझ्यासाठी फारसं महत्व उरलं नाही. असंही मी ते फार गंभीरपणे घेतलं नसतं.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात