मुंबई, 8 एप्रिल- सोशल मीडियावर कधी बॉलिवूड सेलेब्सचे बालपणीचे फोटो तर कधी व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ किंग खान शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिचा आहे. या व्हिडिओतील बालपणीची सुहाना आणि आताची सुहान यामध्ये चांगलाच फरक दिसून येत आहे. विशेष म्हणजे तील ओळखता देखील येत नाही. सुहानाचे बोबडे बोल आणि तिच्या क्यूटनेस चाहत्यांना प्रचंड आवडलेला आहे. विशेष म्हणजे या व्हि़डिओत सुहाना तिची आई गौरी खान हिची हुबेहुब नक्कल करून दाखवत आहे. ज्याप्रामाणे गौरी खान नवरा शाहरूख खानला हाक मारते अगदी त्याचप्रमाणे मुलगी सुहाना देखील शाहरूखला हाक मारताना दिसत आहे. सुहानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे चाहते देखील कमेंट करत कौतुक करत आहेत. वाचा- वरुण धवनने का पसरवलेली क्रिती सेनन-प्रभासच्या अफेयरची अफवा? समोर आलं खरं कारण या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहरूख खान खुर्चीवर बसलेला आहे. तेवढ्यात क्यूटवाली सुहाना तिथे येते मग शाहरूख खान सुहानाला सांगताना दिसत आहे की, तुझी मम्मी गौरी खाना पप्पांना कशी हाक मारते. यावर सुहाना लगेच आपल्या मम्मीची कशी नक्कल करून दाखवते.ती तिच्या कूयटवाल्या अंदाजात म्हणताना दिसत आहे की, शाहरूख तुझं जेवण कर.. नंतर सुहाना लगेच तिच्या वडिलांच्या म्हणजे शाहरूखच्या मांडीवर बसते. या व्हिडिओत सुहानानं पिंक रंगाचा फ्रॉक घातलेला दिसत आहे. तर शाहरूख खाननं पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. आपल्या मुलीचा हा क्यूटवाला अंदाज पाहून शाहरूखच्या चेहऱ्यावर देखील हासू उमटलं आहे.
बाजीगर पठाणने हा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांनी देखील यावर कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले आहे की, एक लक्षात येत आहे की शाहरूख खानला घऱात कुठल्या वेगळ्या नावाने बोलवत नाहीत. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, बेस्ट फादर डॉटर डूओ.
सुहाना खान लवकर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तर पदार्पणापूर्वीच चाहत्यांना तिच्या हसण्याने आणि लूकने भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे. शाहरुख खानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर पठाणच्या यशानंतर चाहत्यांचे लक्ष त्याच्या आगामी जवान या सिनेमावर लागून राहिले आहे. याशिवाय नुकतेच टायगर व्हर्सेस पठाण या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत.