मुंबई, 8 एप्रिल- मनोरंजनसृष्टीत सतत कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या अफेयर्स आणि ब्रेकअपच्या बातम्या समोर येत असतात. यामध्ये काही बातम्या खऱ्या ठरतात तर काही निव्वळ अफवा असल्याचं समोर येतं. गेल्या अनेक दिवसांपासून साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन च्या अफेयर्सच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. इतकंच नव्हे तर या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचंदेखील म्हटलं जात होतं. अशातच वरुण धवन नेसुद्धा क्रितीच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाल्याचं म्हटलं होतं. वरुणच्या या वक्तव्यानंतर लोकांना जवळजवळ या गोष्टीवर विश्वासच बसला होता. क्रिती सेनन आणि प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा होत आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि पोस्टरवरुन अनेक वादही निर्माण झाले होते. मात्र या दोघांच्या चाहत्यांना चित्रपटाची प्रचंड उत्कंठा लागून आहे. दरम्यान या चित्रपटाच्या सेटवर क्रिती आणि प्रभास एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर दोघांनीही मालदीवमध्ये गुपचूप साखरपुडा उरकल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र या दोघांच्या टीमने या निव्वळ अफवा असल्याचं सांगत या चर्चांना पूर्णविराम लावला होता. (हे वाचा: अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात वेडी झालेली मोनिका बेदी; जावं लागलं तुरुंगात, संपलं करिअर ) दरम्यान क्रिती सेनन अभिनेता वरुण धवनसोबत ‘भेडिया’ या चित्रपटात झळकली होती. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान वरुणने क्रितीच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाल्याचं म्हटलं होतं. वरुण तिच्या आयुष्यात एक शेहजादा आल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिती आणि प्रभासच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. तर काहींचं म्हणणं होतं की, शेहजादा म्हणजे कार्तिक आर्यन आहे. तत्पूर्वी आता क्रिती सेननने वरुणच्या त्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत क्रिती सेननने सांगितलं की, ‘मी आणि वरुण ज्यावेळी भेडियाचं प्रमोशन करत होतो. तेव्हा सतत त्याच त्याच प्रश्नांनी आणि उत्तरांनी वरुण कंटाळला होता. त्याला मजेशीर,तिखट असं काहीतरी हवं असतं. आणि त्यामुळेच तो मला म्हणाला क्रिती मी तुझ्याबाबत एक अफवा पसरवणार आहे. मी फक्त सांगणार की, तुझ्या आयुष्यात कुणीतरी आहे’.
त्यांनतर वरुण धवनने ‘झलक दिखला जा’च्या सेटवर करण जोहर समोर म्हटलं की, ‘क्रितीच्या आयुष्यात कुणीतरी आहे. आणि ते सर्व आता दीपिका पादुकोणसोबत हैद्राबादमध्ये शूटिंग करत आहेत. त्याचवेळी प्रभास दीपिकासोबत प्रोजेक्ट केचं हैद्राबादमध्ये शूटिंग करत होता. त्यामुळे या अफवांनी आणखीनच जोर पकडला होता. मात्र वरुणने हे सर्व केवळ मजेसाठी केल्याचं क्रितीने म्हटलं आहे.