• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ' फॉर द लव्ह...' म्हणत सई ताम्हणकरनं शेअर केला सुपरक्लासी VIDEO; चाहत्यांसोबत कलाकारही झाले फिदा!

' फॉर द लव्ह...' म्हणत सई ताम्हणकरनं शेअर केला सुपरक्लासी VIDEO; चाहत्यांसोबत कलाकारही झाले फिदा!

अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar) नेहमीच काहीतरी वेगळं आणि हटके करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक हटके अंदाजाला भरभरून प्रतिसाद देत असतात.

 • Share this:
  मुंबई, 17 सप्टेंबर- अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar) नेहमीच काहीतरी वेगळं आणि हटके करत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक हटके अंदाजाला भरभरून प्रतिसाद देत असतात. सईने मराठी चित्रपटसृष्टीत आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. सई सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असते. नुकताच सईने आपल्या इन्स्टाग्रामवर आपला एक स्लो मोशन व्हिडीओ शेअर(Share Video) करत चाहत्यांना खुश केलं आहे.
  अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. सईला मराठी चित्रपटसृष्टितील एक बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. 'मिमी' मधून आपल्या अभिनयाचा कस दाखवून देणाऱ्या सईने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक स्लो मोशन व्हिडीओ आहे. यामध्ये सई सुपर क्लासी लुकमध्ये दिसून येत आहे. सईचेएक्स्प्रेशन पाहून चाहते घायाळ होत आहेत. (हे वाचा:'पहिला पगार ते पहिली गर्लफ्रेंड' उमेश कामतनं पहिल्यांदाच सांगितलं गुपित) सईने हा व्हिडीओ शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे.हा व्हिडीओ पाहून चाहते सईला परम सुंदरी, हवा हवाई, ग्लॅमरस, गॉर्जिअस अशा विविध कमेंट्स देत आहेत. फक्त चाहतेच नव्हे तर सईच्या या अंदाजावर कलाकारसुद्धा फिदा झाले आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशीनेसुद्धा सईला कमेंट् करत तिचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर सईला भरभरून प्रेम मिळत आहे. (हे वाचा:Video : Marathi Bigg Boss सीजन 3 मध्ये तुफान आणणाऱ्या सदस्यांचा First Look) सई सध्या सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमात दिसून येत आहे. या कार्यक्रमात ती परीक्षकाच्या भूमिकेत आहे. या कार्क्रमातसुद्धा सईचा प्रत्येक लुक चर्चा विषय असतो. सई मराठीतील एक स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या कार्यक्रमात सईसोबत अभिनेता प्रसाद ओकसुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत आहे. फक्त मराठीतच नव्हे हिंदीमध्येही सईने आपलं अभिनय कौशल्य दाखवलं हं. नुकताच सई ताह्मणकर क्रिती सेननची मुख्य भूमिका असलेल्या 'मिमी' या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील सईच्या कामाचं विशेष कौतूक होत आहे. चित्रपटा दरम्यान सई आणि क्रितीमध्ये चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या दोघींचे अनेक फोटोसुद्धा सोशल मीडियावर पाहायला माळले होते.
  Published by:Aiman Desai
  First published: